मुंबई

चार वर्षांच्या मुलाची आईच्या प्रियकराकडून हत्या; लघुशंका केली म्हणून लाथाबुक्क्यांनी मारहाण

: कुर्ला येथे ओमकार नावाच्या एका चार वर्षांच्या मुलाची त्याच्याच आईच्या प्रियकराने हत्या केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे.

Swapnil S

मुंबई : कुर्ला येथे ओमकार नावाच्या एका चार वर्षांच्या मुलाची त्याच्याच आईच्या प्रियकराने हत्या केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. विजारीवर लघुशंका केली म्हणून त्याने मुलाला लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केल्याचे तपासात समोर आले आहे. याप्रकरणी हत्येच्या गुन्ह्यांत रितेशकुमार चंद्रवंशी या आरोपी प्रियकराला नेहरूनगर पोलिसांनी अटक केली आहे.

कुर्ला येथील नेहरुनगर, साबळेनगर, पत्रा चाळीत पूजाकुमारी ही महिला तिच्या दोन मुलांसोबत राहते. आरोपी हा तिच्या मामाच्या मुलीचा मुलगा असून या दोघांचे एकमेकांवर प्रेम करत होते. तिचे तिच्या पतीसोबत वाद असल्याने ती सध्या रितेशकुमारसोबत लिव्ह इन रिलेशनशीपमध्ये राहत होती. तिचा चार वर्षांचा मुलगा ओमकार याने रितेशकुमारच्या विजारीवर लघुशंका केली. त्याचा त्याला राग आला आणि त्याने त्याला लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली होती. त्यात तो गंभीररीत्या जखमी झाल्याने त्याला उपचारासाठी सायन रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. पण उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला होता. शवविच्छेदन अहवालात त्याचा मारहाणीत मृत्यू झाल्याचे उघडकीस आले होते. त्यामुळे पूजाकुमारी हिच्या तक्रारीवरुन पोलिसांनी तिचा प्रियकराविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल केला होता.

शिक्षणातून वैज्ञानिक दृष्टिकोन

जरांगे पाटलांचा विषय इथे संपतो का?

सप्टेंबर महिना कसा जाईल? बघा तुळ आणि वृश्चिक राशीचे भविष्य

विरार-अलिबाग अंतर दोन तासांत पार होणार; मल्टिमॉडेल मार्गिकेला राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी

मराठा आंदोलनाचा विजय! अखेर मनोज जरांगे-पाटलांनी पाचव्या दिवशी उपोषण सोडले; राज्य सरकारकडून ८ पैकी ६ मागण्या मान्य