मुंबई: मध्य आणि पश्चिम रेल्वे मार्गावरील १२ पूल धोकादायक स्वरूपाचे आहेत. श्रीगणेशाचे आगमन विसर्जनाच्या मिरवणुकीदरम्यान या पुलांवरून जाताना काळजी घ्यावी, असे आवाहन महानगरपालिका व मुंबई पोलिसांनी केले आहे.
मध्य रेल्वेवरील घाटकोपर रेल्वे उड्डाणपूल, करी रोड रेल्वे उड्डाणपूल, आर्थर रोड रेल्वे उड्डाणपूल किंवा चिंचपोकळी रेल्वे उड्डाणपूल, भायखळा रेल्वे उड्डाणपुलावरून मिरवणूक नेताना काळजी घ्यावी. तसेच पश्चिम रेल्वे मार्गावरील मरीन लाईन्स रेल्वे उड्डाणपूल, सँडहर्स्ट रोड रेल्वे उड्डाणपूल (ग्रॅन्ट रोड व चर्नी रोडच्या मध्ये), फ्रेंच रेल्वे उड्डाणपूल (ग्रॅन्ट रोड व चर्नी रोडच्या मध्ये), केनडी रेल्वे उड्डाणपूल (ग्रॅन्ट रोड व चर्नी रोडच्या मध्ये), फॉकलॅन्ड रेल्वे उड्डाणपूल (ग्रॅन्ट रोड व मुंबई सेंट्रलच्या मध्ये), महालक्ष्मी स्टेशन रेल्वे उड्डाणपूल, प्रभादेवी-कॅरोल रेल्वे उड्डाणपूल आणि दादर येथील लोकमान्य टिळक रेल्वे मार्गावरील मरीन लाईन्स रेल्वे उड्डाणपूल, सँडहर्स्ट रोड रेल्वे उड्डाणपूल (ग्रॅन्ट रोड व चर्नी रोडच्या मध्ये), फ्रेंच रेल्वे उड्डाणपूल (ग्रॅन्ट रोड व चर्नी रोडच्या मध्ये), केनडी रेल्वे उड्डाणपूल (ग्रॅन्ट रोड व चर्नी रोडच्या मध्ये), फॉकलॅन्ड रेल्वे उड्डाणपूल (ग्रॅन्ट रोड व मुंबई सेंट्रलच्या मध्ये), महालक्ष्मी स्टेशन रेल्वे उड्डाणपूल, प्रभादेवी-कॅरोल रेल्वे उड्डाणपूल आणि दादर येथील लोकमान्य टिळक रेल्वे उड्डाणपूलावरून मिरवणूक नेताना काळजी घ्यावी.