Mumbai : गणेशोत्सवात भक्तांसाठी मोबाईल टॉयलेटची व्यवस्था करा! समन्वय समितीची पालिका आयुक्तांकडे मागणी 
मुंबई

Mumbai : गणेशोत्सवात भक्तांसाठी मोबाईल टॉयलेटची व्यवस्था करा! समन्वय समितीची पालिका आयुक्तांकडे मागणी

मुंबईत १२ हजारांहून अधिक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ असून लालबाग, चिंतामणी, गणेश गल्ली येथे गणेश भक्तांची तुफान गर्दी होते. अनेक ठिकाणी भाविकांना तासन्‌तास दर्शनाच्या रांगेत उभे राहावे लागते. या पार्श्वभूमीवर भाविकांच्या सोयीसाठी मोठ्या सार्वजनिक गणेश मंडळांच्या गणेश दर्शन रांगेच्या ठिकाणी पुरेशा संख्येने मोबाईल टॉयलेटची व्यवस्था करावी...

Swapnil S

मुंबई : मुंबईत १२ हजारांहून अधिक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ असून लालबाग, चिंतामणी, गणेश गल्ली येथे गणेश भक्तांची तुफान गर्दी होते. अनेक ठिकाणी भाविकांना तासन्‌तास दर्शनाच्या रांगेत उभे राहावे लागते. या पार्श्वभूमीवर भाविकांच्या सोयीसाठी मोठ्या सार्वजनिक गणेश मंडळांच्या गणेश दर्शन रांगेच्या ठिकाणी पुरेशा संख्येने मोबाईल टॉयलेटची व्यवस्था करावी, अशी मागणी बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीने महापालिका आयुक्तांकडे केली असल्याची माहिती समितीचे अध्यक्ष ॲड. नरेश दहिबावकर यांनी दिली.

गणेशोत्सवात प्रमुख गणेश मंडळांच्या गणपती दर्शनासाठी महिला, लहान मुले, ज्येष्ठ नागरिक तसेच पुरुष मोठ्या संख्येने सहभागी होतात. गर्दीच्या परिस्थितीत भाविकांना अर्धा ते एक तास किंवा त्याहून अधिक काळ रांगेत थांबावे लागते. स्वच्छतागृहाची सुविधा उपलब्ध नसल्यास महिला, लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिकांची मोठी गैरसोय होऊ शकते. भाविकांची गर्दी होणाऱ्या गणेश मंडळांची महापालिकेने पूर्वनियोजित यादी तयार करावी आणि त्यानुसार दर्शन रांगेच्या ठिकाणी आवश्यक संख्येने मोबाईल टॉयलेट उपलब्ध करून द्यावीत.

भाविकांना सन्मानजनक सुविधा मिळाव्यात

गणेशोत्सव हा मुंबईच्या सामाजिक आणि सांस्कृतिक जीवनाचा अविभाज्य भाग आहे. भाविकांना सुरक्षित, स्वच्छ आणि सन्मानजनक वातावरणात श्री गणेशाचे दर्शन घेता यावे, यासाठी गर्दी नियंत्रण आणि वाहतूक व्यवस्थेबरोबरच मूलभूत नागरी सुविधांकडेही विशेष लक्ष देणे आवश्यक आहे, असे बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीचे अध्यक्ष ॲड. नरेश दहिबावकर यांनी सांगितले.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

७०२ कोटींचा प्रस्ताव मंजूर; सायन्स सेंटर मेट्रो स्थानक ते वरळी प्रॉमेनेड जोडणाऱ्या पादचारी पुलाचा मार्ग मोकळा

Navi Mumbai : उरणला साथीच्या आजारांचा विळखा; रुग्णालयांत रुग्णांची गर्दी

ST सहकारी बँकेत ३४ कोटींचा गैरव्यवहार? खरेदी व्यवहाराची चौकशी करण्याची मागणी

अखिल भारतीय गांधी साहित्य संमेलन ऑक्टोबरमध्ये; तुषार गांधी यांची माहिती

AI मुळे जाहिराती क्षेत्रात संधी; महागड्या माध्यमांवर जाहिरात करणे उद्योगांना शक्य