'गारगाई'चे पाणी येणार मुंबईच्या अंगणी; धरणाला केंद्रीय वन्यजीव महामंडळाची मंजुरी 
मुंबई

'गारगाई'चे पाणी येणार मुंबईच्या अंगणी; धरणाला केंद्रीय वन्यजीव महामंडळाची मंजुरी

मुंबईकरांची भविष्यातील पाण्याची गरज भागवण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरणाऱ्या गारगाई धरण प्रकल्पाला अखेर मोठा दिलासा मिळाला आहे. प्रकल्पासाठी आवश्यक असलेली केंद्रीय वन्यजीव महामंडळाची अंतिम मंजुरी मिळाल्याने अनेक वर्षांपासून रखडलेल्या प्रकल्पातील एक मोठा अडथळा दूर झाला आहे.

Swapnil S

मुंबई : मुंबईकरांची भविष्यातील पाण्याची गरज भागवण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरणाऱ्या गारगाई धरण प्रकल्पाला अखेर मोठा दिलासा मिळाला आहे. प्रकल्पासाठी आवश्यक असलेली केंद्रीय वन्यजीव महामंडळाची अंतिम मंजुरी मिळाल्याने अनेक वर्षांपासून रखडलेल्या प्रकल्पातील एक मोठा अडथळा दूर झाला आहे. आता राज्य आणि केंद्र सरकारच्या वन विभागाच्या उर्वरित दोन परवानग्या मिळवण्यासाठी महापालिका प्रशासनाने वेगाने हालचाली सुरू केल्या आहेत.

येत्या दीड महिन्यात या परवानग्या मिळवून नवीन वर्षात प्रत्यक्ष काम सुरू करण्याचे नियोजन आहे. प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर जून २०२९ पासून मुंबईला दररोज ४४० दशलक्ष लिटर अतिरिक्त पाणी उपलब्ध होणार आहे.

नव वर्षात प्रत्यक्ष कामाला सुरुवात...

राज्य वन विभागाची मंजुरी मिळाल्यानंतर केंद्र सरकारकडे शिफारस पाठवून अंतिम परवानगी घेण्याची प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे. या सर्व परवानग्या लवकर मिळवून नवीन वर्षात प्रत्यक्ष कामाला सुरुवात करण्यासाठी महापालिका प्रशासन प्रयत्नशील आहे.

गारगाई धरणातून मिळणारे पाणी मोडकसागर जलाशयापर्यंत आणण्यासाठी १.६ किलोमीटर लांबीचा बोगदा बांधण्यात येणार आहे. तेथून अस्तित्वातील जलवाहिन्यांद्वारे भांडुप संकुलापर्यंत पाणी पोहोचवले जाईल. प्रस्तावित धरणाची लांबी ९७९.४० मीटर आणि उंची ६९ मीटर असेल.

पर्यावरणविषयक परवानग्यांमुळे प्रकल्प रखडला

मुंबईची सध्याची दैनंदिन पाण्याची मागणी सुमारे ४,४६३ दशलक्ष लिटर असून, महापालिकेकडून सुमारे चार हजार दशलक्ष लिटर पाणीपुरवठा केला जातो. वाढती लोकसंख्या आणि वेगाने डोत असलेले नागरीकरण यामुळे भविष्यातील पाण्याची गरज लक्षात घेऊन २०१५ मध्ये गारगाई धरण प्रकल्पाची आखणी करण्यात आली. मात्र, वनजमिनींचा वापर आणि पर्यावरणविषयक परवानग्यांमुळे हा प्रकल्प रखडला होता.

प्रकल्पामुळे सहा गावांवर परिणाम

या प्रकल्पासाठी एकूण ८४४ हेक्टर जमिनीची गरज असून त्यात ६५७ हेक्टर वनजमीन आणि १८६ हेक्टर खासगी जमिनीचा समावेश आहे. प्रकल्पामुळे सहा गावांवर परिणाम होणार असून, दोन गावे पूर्णतः तर चार गावे अंशतः बाधित होणार आहेत. केंद्रीय वन्यजीव महामंडळाची मंजुरी मिळाल्याने आता उर्वरित वनविषयक परवानग्यांचा मार्ग मोकळा होण्याची अपेक्षा आहे.

(इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

मुलाला दिलेल्या फ्लॅटचे बक्षीसपत्र रद्द; न्यायालयाने ताबा पुन्हा दिला वडिलांकडे

Mumbai : जेजेमध्ये यकृत, किडनी प्रत्यारोपण शस्त्रक्रिया मोफत; यंत्रणा कार्यान्वित करण्याचे मंत्री हसन मुश्रीफ यांचे निर्देश

Mumbai : पालिकेच्या जुन्या इमारतींच्या दुरुस्तीसाठी सल्लागारांची फौज; पुनर्बांधणी, ऑडिटसाठी ८५ सल्लागारांची नियुक्ती

टाटा सन्सकडून हायकोर्ट, सुप्रीम कोर्टात कॅव्हेट दाखल

अंत्योदय योजनेतील मोफत साखरेचा काळाबाजार? सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी