Mumabi : जीएलएमआरसह तीन प्रकल्पांसाठी झाडांचा बळी; ११ झाडांचे पुनर्रोपण प्रस्तावित, नागरिकांना सात दिवसांत हरकती सूचना नोंदवा प्रातिनिधिक छायाचित्र
मुंबई

Mumbai: जीएलएमआरसह तीन प्रकल्पांसाठी झाडांचा बळी; ११ झाडांचे पुनर्रोपण प्रस्तावित, नागरिकांना सात दिवसांत हरकती सूचना नोंदवा

मुंबईतील विकासकामांसाठी पुन्हा एकदा झाडांवर कुऱ्हाड चालवण्याची तयारी सुरू झाली आहे. चेंबूर, घाटकोपर आणि मुलुंड-गोरेगाव लिंक रोड या तीन ठिकाणच्या विविध प्रकल्पांमध्ये एकूण १२ झाडे तोडण्याचे तर पाच झाडांचे पुनर्रोपण करण्याचे प्रस्ताव मुंबई महापालिकेच्या वृक्ष प्राधिकरणाकडे मंजुरीसाठी सादर करण्यात येणार आहे.

Swapnil S

मुंबई : मुंबईतील विकासकामांसाठी पुन्हा एकदा झाडांवर कुऱ्हाड चालवण्याची तयारी सुरू झाली आहे. चेंबूर, घाटकोपर आणि मुलुंड-गोरेगाव लिंक रोड या तीन ठिकाणच्या विविध प्रकल्पांमध्ये एकूण १२ झाडे तोडण्याचे तर पाच झाडांचे पुनर्रोपण करण्याचे प्रस्ताव मुंबई महापालिकेच्या वृक्ष प्राधिकरणाकडे मंजुरीसाठी सादर करण्यात येणार आहे. तरी नागरिकांनी सात दिवसांत हरकती सूचना नोंदवा, असे आवाहन पालिका प्रशासनाने केले आहे.

एम/पश्चिम विभागातील चेंबूर गावातील टिळकनगर येथील कावेरी सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या इमारत क्रमांक २० च्या पुनर्विकासासाठी तीन झाडे तोडण्याचा आणि एका झाडाचे पुनर्रोपण करण्याचा प्रस्ताव आहे. या जागेवर एकूण नऊ झाडे असून, त्यापैकी चार झाडे बाधित होणार आहेत.

चार झाडे तोडणार, एकाचे पुनर्रोपण

घाटकोपर पश्चिमेकडील चिरागनगर येथे साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे संशोधन व प्रशिक्षण संस्थेच्या पहिल्या टप्प्यातील कामासाठी चार झाडे तोडण्याचे आणि एका झाडाचे पुनर्रोपण करण्याचे नियोजन आहे. या जागेवरील पाचही झाडे प्रकल्पामुळे बाधित होणार आहेत. झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाच्या उपप्रमुख अभियंता-२ यांनी हा प्रस्ताव सादर केला आहे.

वृक्षतोडीचा प्रस्ताव दाखल

मुलुंड-गोरेगाव लिंक रोडवरील पिलर क्रमांक १८ ते २२ दरम्यान उड्डाणपूल आणि उन्नत वर्तुळाकार मार्गाच्या बांधकामासाठी पाच झाडे तोडण्याचा आणि तीन झाडांचे पुनर्रोपण करण्याचा प्रस्ताव आहे. या ठिकाणी एकूण २५ झाडे असून त्यापैकी आठ झाडे बाधित होणार असल्याचे प्रस्तावात नमूद करण्यात आले आहे. टेक्नोजेम कन्सल्टंट्स प्रा. लि. यांच्या वतीने हा प्रस्ताव सादर करण्यात आला आहे.

या ठिकाणी हरकती सूचना नोंदवा !

या प्रस्तावांवर नागरिकांना हरकती किंवा सूचना नोंदविता येणार आहेत. जाहीर सूचना प्रसिद्ध झाल्यापासून सात दिवसांच्या आत विहित नमुन्यात उद्यान अधीक्षक व वृक्ष अधिकारी यांच्या कार्यालयात लेखी हरकती सादर कराव्या लागतील. dysg.ta@mcgm.gov.in या ई-मेलवरही हरकती पाठविता येतील. त्यानंतर १३ नोव्हेंबर २०२६ रोजी दुपारी ४.३० ते ५ या वेळेत भायखळा येथील उद्यान अधीक्षक व वृक्ष अधिकारी यांच्या कार्यालयात सुनावणी होणार आहे.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

दंड थकवणाऱ्यांना 'अभय'; दंडावर २० टक्के सवलत, राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय

Mumbai : सिद्धिविनायक मंदिर ट्रस्टला मोठा दिलासा; राम मॅन्शनच्या खरेदी व्यवहारावरील मुद्रांक शुल्क माफ

दिवाळीआधी FDA ची मोठी कारवाई; राज्यव्यापी धडक मोहिमेत १८ अन्न व्यवसाय परवाने निलंबित, ४ आस्थापनांचे कामकाज केले बंद

दिवाळी अंक खरेदीला उत्स्फूर्त प्रतिसाद; महागाईतही किंमती स्थिर, मराठी दिवाळी अंकांची ११७ वर्षांची परंपरा

चॅम्पियन्स ट्रॉफी हॉकी स्पर्धा : भारतीय पुरुष हॉकी संघ सलग तिसऱ्यांदा अंतिम फेरीत