मुंबई

Mumbai : गोरेगाव-मुलुंड जोड रस्त्याचा खर्च महागला; सुधारित बोगदा रचनेमुळे एक हजार कोटींनी वाढ

पूर्व व पश्चिम उपनगरांना जोडणारा जीएमएलआर हा महापालिकेचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असून तो मुंबईतील चौथा पूर्व–पश्चिम जोडरस्ता ठरणार आहे.

Swapnil S

मुंबई : गोरेगाव मुलुंड लिंक रोड मुळे उपनगरातील वाहतूक कोंडी फुटणार आहे. जीएमएलआर प्रकल्पाचे काम वेगाने सुरू असून ३१ मे २०२६ पर्यंत पूल वाहतुकीसाठी खुला करण्याचे निर्देश पालिका प्रशासनाने दिले आहेत. मात्र सुधारित बोगदा रचनेमुळे प्रकल्पाच्या खर्चात एक हजार कोटींनी वाढ झाली आहे.

दरम्यान, प्री-कास्ट डेक स्लॅब व्यवस्थेसह सुधारित बोगदा रेखांकन स्वीकारण्यात आल्याने हा खर्च वाढल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. पूर्व व पश्चिम उपनगरांना जोडणारा जीएमएलआर हा महापालिकेचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असून तो मुंबईतील चौथा पूर्व–पश्चिम जोडरस्ता ठरणार आहे. या प्रकल्पामुळे गोरेगाव येथील पश्चिम द्रुतगती महामार्ग आणि मुलुंड येथील पूर्व द्रुतगती महामार्ग थेट जोडले जाणार असून उपनगरांतील वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात कमी होण्याची अपेक्षा आहे.

असा आहे प्रकल्प

या प्रकल्पाची एकूण लांबी १२.२ किलोमीटर आहे. यामध्ये संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या जमिनीखाली ५.३ किलोमीटर लांबीचा भूमिगत दुहेरी बोगदा प्रस्तावित आहे तसेच गोरेगाव फिल्मसिटी परिसरात कट-अँड-कव्हर पद्धतीचा १.३२ किलोमीटर लांबीचा बोगदा व पोहोच रस्ते उभारण्यात येणार आहेत.

प्रकल्पाचे २० टक्के काम पूर्ण

जे. कुमार इन्फ्राप्रोजेक्ट्स लिमिटेड आणि नागार्जुन कन्स्ट्रक्शन कंपनी यांची या कामासाठी नेमणूक करण्यात आली असून सुरुवातीला विविध करांसह १३,८९१.१२ कोटींचा खर्च मंजूर करण्यात आला. प्रकल्प नोव्हेंबर २०२८ पर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे. सध्या प्रकल्पाचे २० टक्के काम पूर्ण झाले आहे.

आपत्कालीन सुटकेचा मार्ग

सुधारित बोगदा रेखांकनात प्री-कास्ट डेक स्लॅब प्रणालीचा समावेश करण्यात आल्यामुळे रस्त्याखाली अतिरिक्त मोकळी जागा उपलब्ध होणार आहे. ही जागा भविष्यात संभाव्य आपत्कालीन सुटकेच्या मार्गासाठी वापरता येणार आहे.

Mumbai : शीव पूल १५ जुलैपर्यंत वाहतुकीसाठी खुला होणार; अतिरिक्त पालिका आयुक्तांनी केली पाहणी

Budget 2026 : स्वतंत्र भारताचा पहिला अर्थसंकल्प कधी मांडला? उद्या सादर होणारं बजेट कितवं? जाणून घ्या

शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना दिलासा; अनुकंपा तत्त्वावरील नियुक्तीसाठी सुधारित योजना

ठाणे शहरात उभारले जाणार १९ ई-व्हेईकल चार्जिंग स्टेशन्स; प्रमुख चौकांमध्ये उपलब्ध होणार सुविधा; पीपीपी तत्त्वावर प्रकल्पाला मंजुरी

Mumbai : ...ती भ्रूणहत्याच ठरेल; न्यायालयाने नाकारली गर्भपाताची परवानगी; खर्च राज्यशासनाने करण्याचे आदेश