Mumbai : गोवंडीत इमारतीला आग; एक वर्षाच्या चिमुकलीसह एकाच कुटुंबातील तिघे गंभीर जखमी 
मुंबई

Mumbai : गोवंडीत इमारतीला आग; एक वर्षाच्या चिमुकलीसह एकाच कुटुंबातील तिघे गंभीर जखमी

गोवंडी येथे शनिवारी पहाटे एका निवासी इमारतीला आग लागून एक वर्षाच्या चिमुकलीसह एकाच कुटुंबातील तीन जण गंभीररीत्या भाजल्याची माहिती अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी दिली.

Swapnil S

मुंबई : गोवंडी येथे शनिवारी पहाटे एका निवासी इमारतीला आग लागून एक वर्षाच्या चिमुकलीसह एकाच कुटुंबातील तीन जण गंभीररीत्या भाजल्याची माहिती अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी दिली. शनिवारी पहाटे सुमारे ३ वाजून ४० मिनिटांनी शिवाजीनगर रोड क्रमांक ३ येथील चार मजली इमारतीच्या पहिल्या मजल्यावरील एका खोलीत आग लागल्याची घटना घडली. ही आग विद्युत वायरिंग, इलेक्ट्रिकल उपकरणे, कपडे आणि दुचाकीच्या बॅटरीपुरती मर्यादित होती. अग्निशमन दलाने पहाटे ४ वाजून २२ मिनिटांनी आगीवर पूर्णपणे नियंत्रण मिळवले.

मुंबई अग्निशमन दलाने या आगीची नोंद प्रथम स्तरावरील (लेव्हल वन) आग म्हणून केली होती. या दुर्घटनेत सलमान खान (३०), त्यांची पत्नी रोशना (२९) आणि त्यांची मुलगी सुब्रा फातिमा हे तिघे गंभीररीत्या भाजले. त्यांना तातडीने सायन रुग्णालयात दाखल करण्यात आले. आगीचे नेमके कारण आणि या दुर्घटनेत झालेल्या नुकसानीचा तपशील अद्याप स्पष्ट झालेला नाही.

(संबंधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

मुलाला दिलेल्या फ्लॅटचे बक्षीसपत्र रद्द; न्यायालयाने ताबा पुन्हा दिला वडिलांकडे

Mumbai : जेजेमध्ये यकृत, किडनी प्रत्यारोपण शस्त्रक्रिया मोफत; यंत्रणा कार्यान्वित करण्याचे मंत्री हसन मुश्रीफ यांचे निर्देश

Mumbai : पालिकेच्या जुन्या इमारतींच्या दुरुस्तीसाठी सल्लागारांची फौज; पुनर्बांधणी, ऑडिटसाठी ८५ सल्लागारांची नियुक्ती

टाटा सन्सकडून हायकोर्ट, सुप्रीम कोर्टात कॅव्हेट दाखल

अंत्योदय योजनेतील मोफत साखरेचा काळाबाजार? सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी