मुंबई

Mumbai : हार्बर मार्गावर साडेचौदा तासांचा ब्लॉक; शनिवार रात्री ते रविवारी दुपारपर्यंत वडाळा रोड - मानखुर्द दरम्यान लोकल बंद

कुर्ला आणि टिळक नगर स्थानकांदरम्यान नवीन डायव्हर्जन लाईनच्या कामासाठी शनिवारी (ता.१३) रात्री ते रविवारी (ता.१४) दुपारपर्यंत मध्य रेल्वेच्या हार्बर मार्गावर वडाळा रोड-मानखुर्द दरम्यान साडेचौदा तासांचा ब्लॉक घेण्यात आला आहे.

Krantee V. Kale

मुंबई : कुर्ला आणि टिळक नगर स्थानकांदरम्यान नवीन डायव्हर्जन लाईनच्या कामासाठी शनिवारी (ता.१३) रात्री ते रविवारी (ता.१४) दुपारपर्यंत मध्य रेल्वेच्या हार्बर मार्गावर वडाळा रोड-मानखुर्द दरम्यान साडेचौदा तासांचा ब्लॉक घेण्यात आला आहे. यामुळे ब्लॉक कलावधीत वडाळा रोड ते मानखुर्द दरम्यान लोकल ठप्प राहणार आहेत. डाऊन हार्बर मार्गावरुन वाशी/बेलापूर/ पनवेलसाठी ब्लॉकपूर्वीची शेवटची लोकल सीएसएमटीहून रात्री १०. १४ वाजता सुटणार आहे.

कुर्ला आणि टिळक नगर स्थानकांदरम्यान नवीन डायव्हर्जन लाइनच्या कामासाठी शनिवारी रात्री ते रविवारी दुपारपर्यंत ब्लॉक घेण्यात आला आहे. शनिवारी रात्री ११.०५ ते रविवारी दुपारी १ वाजून ३५ मिनिटांपर्यंत ब्लॉक असेल. वडाळा रोड आणि मानखुर्द स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन हार्बर मार्गावर १४.३० तासांचा हा ब्लॉक असून यामुळे लोकल सेवेवर मोठा परिणाम होणार आहे.

ब्लॉक कालावधीत वडाळा रोड आणि मानखुर्द दरम्यान हार्बर मार्गावर उपनगरीय सेवा उपलब्ध राहणार नाहीत. सीएसएमटीहून शनिवारी रात्री १०.२० ते रविवारी दुपारी २.१९ पर्यंत सुटणाऱ्या डाऊन हार्बर सेवा रद्द राहतील. तर शनिवारी रात्री १०.०७ वाजेपासून रविवारी दुपारी १२.५६ वाजेपर्यंत पनवेलहून सीएसएमटीला जाणारी अप हार्बर सेवा रद्द राहणार आहे.

-ब्लॉकपूर्वीची शेवटची पनवेल-सीएसएमटी लोकल रात्री ९.५२ वाजता सुटेल.

-डाऊन हार्बर मार्गावरील वाशी/बेलापूर/पनवेलसाठी ब्लॉकपूर्वीची शेवटची लोकल सीएसएमटीहून शनिवारी रात्री १०.१४ वाजता सुटेल.

-ब्लॉकनंतरची पहिली लोकल अप हार्बर मार्गावरील पनवेल/बेलापूर/वाशी येथून रविवारी दुपारी १.०९ वाजता पनवेलहून सुटेल.

-डाऊन हार्बर मार्गावरील पनवेल/बेलापूर/वाशीसाठी ब्लॉकनंतरची पहिली लोकल सीएसएमटीहून रविवारी दुपारी १.३० वाजता सुटेल.

-ब्लॉकदरम्यान पनवेल-मानखुर्द-पनवेल दरम्यान विशेष लोकल चालवल्या जातील.

''तेव्हाच थांबायला हवं होतं''; प्रकाश महाजन यांची मनसेला सोडचिठ्ठी, नाराजीचे कारण समोर

रक्त व क्रिकेट एकत्र कसे असू शकते? भारत-पाकिस्तान सामन्यावरून आदित्य यांची टीका

संपूर्ण देशात फटाक्यांवर बंदी हवी; सर्वोच्च न्यायालयाची टिप्पणी; स्वच्छ हवा मिळणे हा सर्व नागरिकांचा हक्क

सातारा गॅझेटचा अभ्यास सुरू; मराठा आरक्षण अहवालासाठी तज्ज्ञांची मदत आवश्यक

एलफिन्स्टन पूल बंद; एसटी प्रवाशांना फटका; बस मार्गात बदल केल्याने तिकीट दरात वाढ होणार