मुंबई

ठाकरे कुटुंबाच्या संपत्तीबद्दलची 'ती' याचिका न्यायालयाने फेटाळली; ठोठावला २५ हजारांचा दंड

मुंबई उच्च न्यायालयामध्ये ठाकरे कुटुंबाच्या संपत्तीबाबत एक याचिका करण्यात आली होती, ती न्यायालयाने फेटाळली असून याचिकाकर्त्यांना दंडही ठोठावला

प्रतिनिधी

काही दिवसांपूर्वी गौरी भिडे यांनी मुंबई उच्च न्यायालयात ठाकरे कुटुंबाच्या संपत्तीबद्दल एक याचिका केली होती. ती याचिका न्यायालयाने फेटाळली असून गौरी भिडेंना तब्बल २५ हजारांचा दंड ठोठावला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, गौरी भिडेंनी केलेल्या याचिकेवरुन आरोप सिद्ध करण्यास कमी पडल्या, त्यामुळे त्यांना हा दंड ठोठावण्यात आला. ही याचिका फेटाळल्यामुळे ठाकरे कुटुंबाला मोठा दिलासा मिळाला आहे.

गौरी भिडे यांनी या याचिकेमध्ये ठाकरे कुटुंबावर भ्रष्टाचाराचे आरोप केले होते. गौरी भिडे या 'राजमुद्रा' प्रकाशनच्या प्रकाशक आहेत. त्यांचा छापखाना हा सामना, मार्मिक प्रकाशित करणारे ठाकरे कुटुंबियांच्या मालकीचा 'प्रबोधन' प्रकाशनचा छापखान्या शेजारीच आहे. यावेळी त्यांनी आरोप केले होते की, "फक्त सामना आणि मार्मिकच्या विक्रीतून एवढी अफाट संपत्ती गोळा होणे शक्य नाही. या जोरावर मातोश्री २ सारखी टोलेजंग इमारती उभी करणे, महागड्या गाड्या घेणे, फार्महाउस घेणे हे अशक्य आहे. कारण माझाही हाच व्यवसाय असून तेवढेच परिश्रम घेते. तरीही आमच्या मिळकतीत जमीन अस्मानाचा फरक कसा?" असा सवाल त्यांनी या याचिकेतून केला होता.

यावर आज सुनावणी झाली, तेव्हा न्यायालयाने गौरी भिडे हे आरोप सिद्ध करण्यास अपयशी ठरल्याचे सांगितले. “याचिकेतील आरोप सिद्ध करण्यासाठी आवश्यक पुरावेच नाहीत. याचिकेत करण्यात आलेले आरोप निराधार असून ही याचिका म्हणजे न्यायालयीन प्रक्रियेचा दुरुपयोग आहे,” अशी टिप्पणी मुंबई उच्च न्यायालयाने याचिका फेटाळताना केली.

थेट निवडून आलेल्या अध्यक्षास सदस्यत्व, मताचा अधिकार; अधिनियमातील सुधारणेसाठी अध्यादेश काढणार; राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी

नितेश राणे, प्रवीण दरेकर, प्रसाद लाड यांना कोर्टाचा दणका; तिन्ही नेत्यांविरोधात अजामिनपात्र अटक वॉरंट

अनिल अंबानी यांना मोठा दिलासा; तीन बँकांच्या कारवाईला कोर्टाची स्थगिती

उद्धव-राज २० वर्षानंतर एकत्र; शिवसेना-मनसे युतीवर अखेर शिक्कामोर्तब! मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले

चेन्नईच्या विद्यार्थ्यांना ‘नासा’चा पुरस्कार; स्वस्त, स्वदेशी इंटरनेटचा प्रकल्प साकारला