१०० उठाबशा; मृत्यूची चौकशी करा! हायकोर्ट रजिस्ट्रारचे पोलीस आयुक्तांना निर्देश 
मुंबई

१०० उठाबशा; मृत्यूची चौकशी करा! हायकोर्ट रजिस्ट्रारचे पोलीस आयुक्तांना निर्देश

१०० उठाबशा काढण्याच्या शिक्षेमुळे विद्यार्थिनीचा मृत्यू झाल्याच्या घटनेची उच्च न्यायालयाच्या रजिस्ट्रार ज्युडिशियलने गंभीर दखल घेतली. मुलीच्या मृत्यूची सखोल चौकशी करण्यात यावी, असे स्पष्ट निर्देश रजिस्ट्रारनी मीरा-भाईंदर आणि वसई-विरारचे पोलीस आयुक्त तसे वसई-विरार पालिकेला दिले आहेत.

Swapnil S

मुंबई : १०० उठाबशा काढण्याच्या शिक्षेमुळे विद्यार्थिनीचा मृत्यू झाल्याच्या घटनेची उच्च न्यायालयाच्या रजिस्ट्रार ज्युडिशियलने गंभीर दखल घेतली. मुलीच्या मृत्यूची सखोल चौकशी करण्यात यावी, असे स्पष्ट निर्देश रजिस्ट्रारनी मीरा-भाईंदर आणि वसई-विरारचे पोलीस आयुक्त तसे वसई-विरार पालिकेला दिले आहेत. त्यामुळे मुलीच्या मृत्यूला जबाबदार ठरलेल्या असलेल्यांचे धाबे दणाणले आहेत.

सहावीतील शिकणाऱ्या विद्यार्थिनीला शाळेच्या बॅगेसह १०० उठाबशा काढायला लावण्यात आल्या. याप्रकरणी ॲड. स्वप्ना कोदे यांनी उच्च न्यायालयाला पत्र लिहिले. त्याला अनुसरून उच्च न्यायालयाच्या रजिस्ट्रार ज्युडिशिअलने चौकशीचे प्रशासकीय निर्देश दिले आहेत. वसई-विरार आणि मीरा-भाईंदरचे पोलीस आयुक्त तसेच वसई-विरार पालिका प्रशासनातील अधिकाऱ्यांनी कायद्यानुसार या प्रकरणाची चौकशी करावी आणि ॲड. स्वप्ना कोदे यांना संबंधित चौकशीच्या तपशिलाबाबत लवकरात लवकर माहिती द्यावी, असे निर्देश देण्यात आले आहेत.

न्यायालयाने विद्यार्थिनीच्या मृत्यूच्या घटनेची दखल घ्यावी तसेच सरकार आणि राज्याच्या पोलीस महासंचालकांना नोटीस बजावावी, शाळा व्यवस्थापन आणि संबंधित शिक्षकाविरुद्ध गुन्हा नोंदवावा, अशा मागण्या ॲड. कोदे यांनी केल्या होत्या. त्याची गंभीर दखल घेत उच्च न्यायालयाच्या रजिस्ट्रार ज्युडिशिअल कार्यालयाने चौकशीचे निर्देश दिले आहेत.

IND vs SA : दक्षिण आफ्रिकेचा ऐतिहासिक विजय; भारताचा कसोटी क्रिकेट इतिहासातला मोठा पराभव

पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांची हत्या? तुरुंगात विष दिल्याचा आरोप; कुटुंबियांवर लाठीचार्ज

केंद्रीय मंत्र्यांचा 'बॉम्बे' उच्चार; राज ठाकरेंकडून कानउघडणी, म्हणाले, 'मुंबई' नाव खटकतं कारण...

डोंबिवली : भीक मागणाऱ्या तरुणीला दिला आसरा; पाच वर्षांनी केला तिचा खून, खाडीत सुटकेसमध्ये आढळला मृतदेह, धक्कादायक Video समोर

"माझा मुलगा असा वागला असता तर..."; पंकजा मुंडेंनी घेतली गौरी गर्जेच्या कुटुंबीयांची भेट