उष्णतेच्या लाटेचा इशारा मुंबई तापली! ठाणे, पालघर जिल्ह्यातील पारा ३८ अंश सेल्सिअस पार छायाचित्र : सलमान अनसारी
मुंबई

मुंबई तापली! उष्णतेच्या लाटेचा इशारा; ठाणे, पालघर जिल्ह्यातील पारा ३८ अंश सेल्सिअस पार

मुंबईसह ठाणे, पालघर आणि रायगड जिल्ह्यांमध्ये तापमानात मोठी वाढ होण्याची शक्यता आहे. मंगळवारी उष्णतेच्या लाटेचा (हिट वेव्ह) इशारा देण्यात आला असून पारा ३८ अंश सेल्सिअसवर जाण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

Swapnil S

मुंबई : मुंबईसह ठाणे, पालघर आणि रायगड जिल्ह्यांमध्ये तापमानात मोठी वाढ होण्याची शक्यता आहे. मंगळवारी उष्णतेच्या लाटेचा (हिट वेव्ह) इशारा देण्यात आला असून पारा ३८ अंश सेल्सिअसवर जाण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. कुलाबा हवामान विभागाने या चारही जिल्ह्यांतील नागरिकांनी काळजी घ्यावी, असे आवाहन केले आहे. दरम्यान, फेब्रुवारीपासूनच उन्हाचे चटके बसत असून नागरिकांचा घामटा निघत आहे. सोमवारी मुंबईचा पारा ३८.०४ अंश सेल्सिअसवर पोहोचला.

मुंबईसह राज्यातील तापमानात वाढ होत असून मंगळवारी मुंबईसह ठाणे, पालघर, रायगड जिल्ह्यातील पारा ३७ अंश सेल्सिअस पार जाण्याचा इशारा कुलाबा हवामान विभागाने दिला आहे.‌ दरम्यान, ‘हिट वेव्ह’चा इशारा देण्यात आला असून दुपारी १२ ते सायंकाळी ४ वाजेपर्यंत शक्यतो घरातून बाहेर पडणे टाळावे, असे आवाहन कुलाबा हवामान विभागाचे अधिकारी सुषमा नायर यांनी केले आहे. दोन आठवड्यापासून मुंबई, ठाणे, रायगड जिल्ह्यातील तापमानात वाढ झाल्याने अंगांची लाही लाही होत आहे. त्यातच पुन्हा एकदा तापमानात वाढ होत असून हवामान विभागाच्या अंदाजानुसार, कमाल तापमान ३८ अंश सेल्सिअसच्या दरम्यान जाण्याची शक्यता आहे. दमट वातावरणामुळे उष्णतेचा त्रास अधिक जाणवू शकतो. त्यामुळे लहान मुले, ज्येष्ठ नागरिक तसेच दीर्घकालीन आजार असलेल्या व्यक्तींनी विशेष काळजी घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

‘हिट वेव्ह’मुळे आरोग्यावर परिणाम

  • मनुष्य व पक्ष्यांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होतो.

  • शरीरातील पाणी कमी होते आणि थकावट, चक्कर येते, डोके दुखते, घाम येतो.

  • तणावात वाढ, फिट येणे, ताप येणे असा त्रास होऊ शकतो.

"आंदोलन होणारच"; जंतर-मंतरवरील आंदोलनाला पोलिसांनी परवानगी नाकारल्यावरही अभिजीत दिपके ठाम, म्हणाले - 'तरुणांची भीती...

Nana Patekar Passes Away : 'नानाने माझा जीव वाचवला'; अशोक सराफ यांनी सांगितला भावूक प्रसंग

क्रिकेटसाठी कल्याणहून रत्नागिरीला पोहोचले, पण सामना संपल्यानंतर मृत्यूने गाठले; डोहात बुडून दोन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

'ऑक्टोबर हिट'चा तडाखा! मुंबई, रायगडमध्ये आज उष्णतेची पहिली लाट; ‘यलो अलर्ट’ जारी, कोकणासह ठाणे-पालघरही तापणार

वाढत्या उष्म्याने ठाणे तापले; पाखरांची तहान वाढली, ३६-३७ अंशांचा पारा, मध्यरात्रीही ३०-३१ अंशांची धग