Mumbai : पावसामुळे दाणादाण! सात दिवसांत ११ मृत्यू, २२ जखमी; एक हजाराहून अधिक झाडे कोसळली, १३०० हून अधिक फांद्या कोसळल्या 
मुंबई

Mumbai : पावसामुळे दाणादाण! सात दिवसांत ११ मृत्यू, २२ जखमी; एक हजाराहून अधिक झाडे कोसळली, १३०० हून अधिक फांद्या कोसळल्या

मुंबईत जून अखेरनंतर पावसाचे आमगन झाले आणि जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पावसामुळे मुंबईकरांची दाणादाण उडाली.

Swapnil S

मुंबई : मुंबईत जून अखेरनंतर पावसाचे आमगन झाले आणि जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पावसामुळे मुंबईकरांची दाणादाण उडाली. मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी झाडे, झाडांच्या फांद्या कोसळण्याच्या घटना घडल्या. मुंबईत विविध ठिकाणी पडझडीच्या घटनांमध्ये गेल्या सात दिवसांत ११ जणांना जीव गमवावा लागला असून २२ जण जखमी झाले आहेत.

मुंबईत सतत कोसळणाऱ्या पावसामुळे एक हजाराहून अधिक झाडे व १३०० हून अधिक झाडांच्या फांद्या कोसळण्याच्या घटना घडल्या आहेत. जून महिनाअखेरीस पावसाने हजेरी लावण्यास सुरुवात केली. मुंबईला गेल्या आठ दिवसांत अक्षरशः झोडपून काढले. मुंबईत सोसायटीच्या वाऱ्यासह बरसणाऱ्या पावसामुळे झाडे उन्मळून पडली. चेंबूर येथे स्कूल बसवर पिंपळाचे झाड कोसळले आणि विहानचा (११) करुण अंत झाला, तर कुर्ला पश्चिम कमानी येथे दुकानावर झाड कोसळल्याने युनूस कुंदावाला यांचा

मृत्यू झाला. आरेमध्येही दुचाकीवरून जाणाऱ्या १८ वर्षीय तरुणावर फांदी पडल्याने त्याचा मृत्यू झाला. या घटना घडत असतानाच मानखुर्द येथे घर कोसळून सहा जण दगावले. वाळकेश्वर येथे घराच्या बाल्कनीचा भाग कोसळून एकाचा मृत्यू, साकीनाकामध्ये मॅनहोलमध्ये पडून ५५ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला. अशा विविध घटनेत ११ जणांनी जीव गमावल्याची नोंद झाली आहे. मुंबईत २२ जून ते ६ जुलै या

कालावधीत एक हजारपेक्षा जास्त झाडे कोसळली आहेत, तर याच कालावधीत १ हजार ३०० पेक्षा जास्त झाडाच्या फांद्या कोसळण्याच्या घटनांची नोंद महापालिकेकडे झाली आहे. रविवारी सकाळी नऊ ते रात्री ७पर्यंत ३२७ झाडे आणि ४६८ फांद्या कोसळल्या आहेत. सर्वाधिक मुंबईतील शहरांत १३९ झाडे कोसळली आहेत. यामध्ये

महापालिका हद्दीतील ८५ झाडे आणि खासगी हद्दीतील ५४ झाडे कोसळली आहेत. तर शहरांत १७४ ठिकाणी फांद्या कोसळण्याच्या घटना घडल्या. सोमवारी सोसाट्याचा वारा आणि पाऊस यामुळे सकाळी ८ ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत १९१ पेक्षा जास्त झाडे व फांद्या कोसळल्याची माहिती महापालिकेने दिली.

पाणी साचल्याने बेस्ट बसेसचे मार्ग वळवले

सकाळपासून कोसळणाऱ्या पावसात विद्याविहार, मालाड, अंधेरी आदी ठिकाणी पावसाचे पाणी साचल्याने बेस्ट बसगाड्यांची आणि अन्य वाहनांची वाहतूक अन्य पर्यायी मार्गाने वळविण्यात आली. तसेच झाडे/फांद्या पडल्याने भांडूप, मुलुंड, अंधेरी, वर्सोवा, अॅटॉप हिल, मालाड, गोरेगाव, माझगाव, कुलाबा भागातील बेस्ट बसगाड्यांची आणि अन्य वाहनांची वाहतूक पर्यायी मार्गाने वळवण्यात आली.

एकाच दिवसात १० जखमी

रविवारी मुसळधार पाऊस आणि सोसाट्याच्या वाऱ्यामुळे विविध ठिकाणी झाड कोसळून १० जण जखमी झाले. यामध्ये ५ जुलैच्या मध्यरात्री अडीच वाजता जोगेश्वरी पश्चिम आंबोली मटरपाडा येथे घरावर झाड कोसळून सात जण जखमी झाले. त्यापैकी तीन जणांना किरकोळ दुखापत झाली, तर चार जणांना कुपर रुग्णालयात दाखल करण्यात आले. चार जणांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती महापालिकेने दिली. यामध्ये गर्भवती रूपा कनोजिया या महिला जखमी झाल्या. झाड कोसळल्याने काही घरांचेही नुकसान झाले.

गोरेगावात एक जखमी

रविवारी दुपारी पावणेदोन वाजता गोरेगाव पश्चिम येथे मोहन गोखले रोड येथे रिक्षावर झाड कोसळून एक जण जखमी झाला.

वरळीत दोन जखमी

रविवारी सायंकाळी साडेसातच्या सुमारास वरळी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवनसमोर रस्त्यावर झाड कोसळून दोन जण जखमी झाले. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सूरू असून प्रकृती स्थिर आहे.

(संबंधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

काँग्रेसचे आजपासून राज्यभर आंदोलन; ९ जुलैपासून 'रघुपती राघव राजाराम' सत्याग्रह

हेरिटेज इमारतींच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर; मुसळधार पावसामुळे मुंबई विद्यापीठाच्या इमारतीचा दगड कोसळला

अकरावी प्रवेश प्रक्रियेच्या विशेष फेरीस मुदतवाढ; १० लाख ८ हजार ९४ विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित

Monsoon Session : पावसाळी चर्चा वादळी ठरणार; शुक्रवारी विशेष सभागृहाचे आयोजन

Mumbai : बेस्ट, पालिकेला दणका; हायकोर्टाचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना दिलासा