छाया : विजय गोहिल
मुंबई

मुंबई, ठाणे, पालघरमध्ये मुसळधार; सखल भागात साचले पाणी; रेल्वे, रस्ते वाहतुकीवर परिणाम

बऱ्याच दिवसांपासून दडी मारून बसलेल्या पावसाने सोमवारी मुंबई, ठाणे, पालघर परिसरात संततधार कोसळत जोरदार बॅटिंग केली. जोरदार कोसळणाऱ्या पावसामुळे मुंबई शहरासह, उपनगरातील सखल भागात पाणी साचले होते.

Swapnil S

मुंबई : बऱ्याच दिवसांपासून दडी मारून बसलेल्या पावसाने सोमवारी मुंबई, ठाणे, पालघर परिसरात संततधार कोसळत जोरदार बॅटिंग केली. जोरदार कोसळणाऱ्या पावसामुळे मुंबई शहरासह, उपनगरातील सखल भागात पाणी साचले होते. परिणामी, रस्ते व रेल्वे रुळावर पाणी आल्याने वाहतूकही २० ते २५ मिनिटे विलंबाने सुरू होती. यामुळे प्रवाशांचे अतोनात हाल झाले. दरम्यान, येत्या २४ तासांत मुंबई आणि उपनगरांत आकाश साधारणतः ढगाळ राहून मध्यम स्वरूपाचा पाऊस तसेच विजांच्या कडकडाटासह वादळी वारे वाहण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.

नेहमीप्रमाणे अंधेरी सबवेमध्ये पाणी साचल्याने वाहतूक इतर मार्गाने वळवण्यात आली होती. तर वेस्टर्न एक्सप्रेस हायवे आणि लिंकिंग रोडवरही पावसाचा परिणाम दिसून आला. मालाड-कांदिवली लिंकिंग रोडवर वाहतूक कोंडी झाली.

मुंबईत आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सकाळपासून दमदार पावसाने हजेरी लावत संपूर्ण शहराला झोडपून काढले. सकाळी ९.१९ मिनिटांनी समुद्राला भरती होती. याचवेळी संततधार पाऊस कोसळल्याने शहर व उपनगरांतील सखल भागात पाणी साचले. चेंबूर, घाटकोपर, विक्रोळी, सायन गांधी मार्केट, विद्याविहार, चेंबूर शेल कॉलनी, चुनाभट्टी आदी सखल भागात पाणी साचले. दुपारनंतर पावसाचा जोर कमी झाल्यानंतर पालिकेने लावलेल्या पंपामुळे पाण्याचा निचरा झाला. काही ठिकाणी पाणी रस्त्यावर आल्याने वाहनचालकांना वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागले.

पश्चिम महाराष्ट्रात पुणे, सातारा, आणि कोल्हापूरचा घाट परिसर त्याचबरोबर कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर यलो अलर्ट दिला आहे. उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, जळगाव, नंदुरबार, अहिल्यानगर, धुळे या जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम पाऊस होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर, धाराशिव आणि बीड या जिल्ह्यांमध्येही तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

पावसाची नोंद -

  • शहर - २१.४२ मिमी

  • पूर्व उपनगर - ४२.५४ मिमी

  • पश्चिम उपनगर - ४४.९२ मिमी

यथे साचले पाणी

चेंबूर, घाटकोपर, विक्रोळी, सायन गांधी मार्केट, विद्याविहार, चेंबूर शेल कॉलनी, चुनाभट्टी, पवई, मुंबई सेंट्रल, अंधेरी, जुहू, कुर्ला, चकाला, मरोळ.

पडझडीच्या घटना

मुसळधार पावसामुळे शहरात २, पूर्व उपनगरांत २ व पश्चिम उपनगरांत ४ अशा एकूण ८ ठिकाणी झाडे व झाडांच्या फांद्या पडल्याच्या घटना घडल्या. यात कोणीही जखमी झालेले नाही

धरणाखालील गावांना सतर्कतेचा इशारा

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरण क्षेत्रात जोरदार पाऊस कोसळत आहे. यामुळे, मुंबई, ठाणे शहरांना पाणीपुरवठा करणाऱ्या मोडकसागर, अप्पर वैतरणा, मध्य वैतरणा धरणांतून विसर्ग सुरू झाल्याने या धरणांखालील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर वाढल्यामुळे धरणातील पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ हात आहे. यामुळे नदीकाठावरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. तसेच नदीच्या पाण्यात उतरण्यास मनाई करण्यात आली आहे.

एसी लोकलमध्ये पाण्याच्या धारा

मुंबईच्या वातानुकूलित लोकल ट्रेनमधील एसी व्हेंटमधून पावसाचे पाणी गळत असल्याचा व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे. मुंबईत जोरदार पावसामुळे एसी लोकलमध्ये पाणी शिरले. ऐन गर्दीच्या वेळी एसी लोकलच्या छतावरून पाण्याच्या धारा वाहत होत्या. त्यामुळे संतापलेल्या प्रवाशांनी याचा व्हिडीओ बनवून तो सोशल मीडियावर टाकला. व्हिडीओ व्हायरल होताच रेल्वे प्रशासनाने या घटनेची दखल घेतली.

मुंबई, ठाणे, पालघरसाठी पुढील ४८ तासांचा अलर्ट

हवामान विभागाने मुंबई, ठाणे आणि पालघर जिल्ह्यांमध्ये पुढील ४८ ते ७२ तासांसाठी ‘यलो अलर्ट’ जारी केला आहे. त्याच वेळी, रायगड जिल्ह्यातही ऑरेंज अलर्ट जाहीर करण्यात आला आहे. तिथे मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. हवामान विभागाने नागरिकांना समुद्रकिनाऱ्यावर जाऊ नये, असे आवाहन केले आहे. दरम्यान, विदर्भातील सर्व जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे.

2006 Mumbai Local Train Blasts : हायकोर्टाच्या निर्णयाला महाराष्ट्र शासनाचे सुप्रीम कोर्टात आव्हान; २४ जुलैला सुनावणी

‘...तर तुमची अर्थव्यवस्था उद्ध्वस्त करू’; अमेरिकन सिनेटरचा भारताला इशारा, चीन आणि ब्राझिललाही धमकी

Kalyan : ''तुम्ही जरा थांबा'' बोलल्याने परप्रांतिय तरुणाकडून मराठी मुलीला बेदम मारहाण; शिवगाळ करत विनयभंग| Video

जगदीप धनखड यांच्या अचानक राजीनाम्यानंतर उपराष्ट्रपतिपदाच्या शर्यतीत कोण? 'ही' नावे चर्चेत, महाराष्ट्रातील नेत्याचं नावही आघाडीवर

दिव्या देशमुख, कोनेरू हम्पीची ऐतिहासिक भरारी! महिलांच्या विश्वचषक बुद्धिबळ स्पर्धेत भारताकडून पहिल्यांदाच 'अशी' कामगिरी