मुंबई उच्च न्यायालय संग्रहित छायाचित्र, पीटीआय
मुंबई

शाळा सोडल्याचा दाखला वयाचा निर्णायक पुरावा नाही; मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय

‘शाळा सोडल्याचा दाखला’ हा वयाचा निर्णायक पुरावा मानता येणार नाही, असा महत्त्वपूर्ण निर्वाळा उच्च न्यायालयाने एका प्रकरणात दिला आणि त्याच आधारे पोक्सोच्या गुन्ह्यातील आरोपीला जामीन मंजूर केला.

Swapnil S

मुंबई : ‘शाळा सोडल्याचा दाखला’ हा वयाचा निर्णायक पुरावा मानता येणार नाही, असा महत्त्वपूर्ण निर्वाळा उच्च न्यायालयाने एका प्रकरणात दिला आणि त्याच आधारे पोक्सोच्या गुन्ह्यातील आरोपीला जामीन मंजूर केला. २५ वर्षीय तरुणाने पीडित मुलीवर बलात्कार केल्याचा आरोप आहे. तथापि, दोघांमध्ये प्रेमसंबंध असण्याची शक्यता नाकारता येत नसल्याचे न्यायालयाने नमूद केले. न्यायमूर्ती आर. एम. जोशी यांच्या एकलपीठाने हा निर्णय देत आरोपीला जामिनाचा दिलासा दिला.

आरोपी तरुण हा २५ वर्षांचा होता तर मुलगी १५ वर्षांची होती. त्यांचे प्रेमसंबंध होते. आरोपीने आपल्या बहिणीची ओळख करून देण्याच्या बहाण्याने पीडित मुलीला घरी नेले. तेथे पीडित मुलीला फ्लॅटमध्ये डांबून ठेवले आणि बलात्कार केल्याचा आरोप आहे. पीडित मुलीने या संदर्भात जबाब दिल्यानंतर आरोपीची वैद्यकीय तपासणी करण्यात आली होती. त्यानंतर १० ऑगस्ट २०२२ रोजी आरोपी जयेश पारधी याला अटक करण्यात आली होती. तेव्हापासून तो तुरुंगात होता. त्याने अँड. अर्जुन कदम यांच्यामार्फत जामीनासाठी उच्च न्यायालयाचे दार ठोठावले होते.

वसईतील वालीव पोलीस ठाण्यात पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला होता. आरोपीच्या जामीन अर्जावर सुनावणी करताना न्यायमूर्ती आर. एम. जोशी यांच्या एकलपीठाने सुनावणी घेतली.

युद्धविराम पण तात्पुरता; अमेरिका-इराणदरम्यान २ आठवड्यांची शस्त्रसंधी, शुक्रवारी इस्लामाबादमध्ये चर्चेची शक्यता

Baramati By-Election: बारामतीत काँग्रेस उमेदवाराच्या माघारीसाठी प्रयत्न सुरू; सुनेत्रा पवारांचा हर्षवर्धन सपकाळांना फोन

सरकारी भूखंड ४९ वर्षांसाठी भाड्याने मिळणार; सरकारकडून जुन्या धोरणात सुधारणा

मानखुर्दमधील १४०० झोपड्या जमीनदोस्त; २२ एकर सरकारी जमीन अतिक्रमणमुक्त; BMC व जिल्हाधिकाऱ्यांची संयुक्त कारवाई

आदित्य धरला हायकोर्टाचा दिलासा; धुरंधरची पटकथा चोरल्याचा होता आरोप