मुंबई उच्च न्यायालय संग्रहित छायाचित्र, पीटीआय
मुंबई

Mumbai : भागीदारी व्यवसायात महिलेची फसवणूक करणे बिल्डरला भोवले; हायकोर्टाने ७.३९ कोटी रुपयांचा दंड ठेवला कायम

व्यवसायात भागीदार महिलेची फसवणूक करणाऱ्या बिल्डरला उच्च न्यायालयाने दणका दिला. कागदपत्रांमध्ये फेरफार करणे आणि बनावट स्वाक्षऱ्यांचा वापर करणे बिल्डरला महागात पडले.

Swapnil S

मुंबई : व्यवसायात भागीदार महिलेची फसवणूक करणाऱ्या बिल्डरला उच्च न्यायालयाने दणका दिला. कागदपत्रांमध्ये फेरफार करणे आणि बनावट स्वाक्षऱ्यांचा वापर करणे बिल्डरला महागात पडले. कथित फसवणूकप्रकरणी बिल्डर शमशुल खान याला महिला भागीदार अलका चांदेवार यांना ७.३९ कोटी रुपये १० टक्के व्याजासह देण्याचे आदेश न्या. सोमशेखर सुंदरेशन यांच्या एकलपीठाने दिले.

अलका चांदेवार आणि शमशुल खान हे 'मेसर्स सारस डेव्हलपर्स' या गृहनिर्माण संस्थेत भागीदार होते. त्यात अलका यांचा ८० टक्के वाटा होता. मात्र, खान यांनी बनावट कागदपत्रे तयार करून अलका चांदेवार यांनी संस्था सोडल्याचे भासवले आणि त्यांना नफ्यातील वाटा नाकारला. याविरोधात अलका चांदेवार यांनी लवाद प्रक्रिया सुरू केली होती. तेथे बिल्डरने अलका चांदेवार यांच्या बनावट स्वाक्षऱ्या करुन त्याआधारे त्यांची फसवणूक केल्याचे सिद्ध झाले. त्या अनुषंगाने लवादाने बिल्डरला ७.३९ कोटी रुपयांचा दंड ठोठावला होता. त्यावर मुंबई उच्च न्यायालयाने शिक्कामोर्तब केले.

पराभवाच्या द्वेषातून विरोधक आले एकत्र..!

ऑक्टोबर महिना कसा जाईल? बघा धनु आणि मकर राशीचे भविष्य

आजचे राशिभविष्य, ५ ऑक्टोबर २०२६ : जाणून घ्या तुमच्या दिवसाचे ग्रहसंकेत

फेशियल केलं, पण ग्लो २-३ दिवसांतच गायब? 'या' चुका अजिबात करू नका

तीन रखडलेले पूल ऑक्टोबर महिन्यात सेवेत; सायन पुलाची डेडलाइन पुन्हा हुकली, विद्याविहार गोरेगाव-चित्रनगरी उड्डाणपूल अंतिम टप्यात