विदेशी निर्यातदारांवर कारवाईचा ‘सीमाशुल्क’ला मर्यादित अधिकार; मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय 
मुंबई

विदेशी निर्यातदारांवर कारवाईचा ‘सीमाशुल्क’ला मर्यादित अधिकार; मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय

विदेशी निर्यातदारांविरोधात ‘कारणे दाखवा नोटीस’ बजावणे तसेच इतर कारवाई करण्याचा सीमाशुल्क विभागाला मर्यादित अधिकार आहे, असा निर्णय उच्च न्यायालयाने दिला.

Swapnil S

मुंबई : विदेशी निर्यातदारांविरोधात ‘कारणे दाखवा नोटीस’ बजावणे तसेच इतर कारवाई करण्याचा सीमाशुल्क विभागाला मर्यादित अधिकार आहे, असा निर्णय उच्च न्यायालयाने दिला. विदेशी निर्यातदाराने परदेशात केलेल्या व्यवहारांसाठी भारतीय सीमाशुल्क कायदा, १९६२ लागू होऊ शकत नाही, असे स्पष्ट करत न्यायमूर्ती गिरीश कुलकर्णी आणि न्यायमूर्ती आरती साठे यांच्या खंडपीठाने ‘कार्ल मेयर’ समूहाला बजावलेल्या सर्व नोटिसा रद्द केल्या.

जर्मनीतील ‘कार्ल मेयर स्टोले टेक्सटाईल मशिन फॅब्रिक जीएमबीएच’ या कंपनीने २०१४ ते २०१७ दरम्यान भारतीय कंपन्यांना कापड विणण्याच्या मशिन्स विकली होती. महसूल गुप्तचर संचालनालयाने कंपनीवर मशिनींचे स्वरूप चुकीचे दाखवल्याचा आरोप केला होता. त्याच आधारे आयातदारांनी सीमाशुल्कात सवलत मिळवून फसवणूक केली, असे संचालनालयाने म्हटले.

या प्रकरणात विदेशी निर्यातदार कंपनीने आयातदारांना मदत केली, असा ठपका ठेवत सीमाशुल्क विभागाने विदेशी निर्यातदारांना नोटिसा बजावल्या होत्या. त्या नोटिशींना उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले होते.सीमाशुल्क कायद्यातील २०१८ ची सुधारणा भारताबाहेर घडलेल्या गुन्ह्यांसाठी लागू होते, ती पूर्वलक्षी प्रभावाने लागू करता येणार नाही, असे न्यायालयाने निरीक्षण नोंदवले.

तीन रखडलेले पूल ऑक्टोबर महिन्यात सेवेत; सायन पुलाची डेडलाइन पुन्हा हुकली, विद्याविहार गोरेगाव-चित्रनगरी उड्डाणपूल अंतिम टप्यात

Thane : एसटीचे 'आवडेल तेथे कोठेही प्रवास पास' आता ऑनलाइन; चार आणि सात दिवसांचे पास घरबसल्या काढता येणार

Thane : पूर्णेकर हत्या प्रकरणी सत्ताधारी -विरोधक आमने-सामने; निष्पक्ष तपासाची आरोप-प्रत्यारोपांना धार

Mumbai : ठाकरे बंधूंचा आज गर्जना मोर्चा

Mumbai : वांद्रे-सी लिंक ते गोरेगाव आता सुसाट; ५० मिनिटांचा प्रवास १५ मिनिटांत, उन्नत मार्ग दीड वर्षांत पूर्ण होणार