Mumbai : दुकान नोंदणीसाठी सोसायटीच्या एनओसीचा आग्रह धरू नका; हायकोर्टाचे जिल्हाधिकाऱ्यांना आदेश (संग्रहित छायाचित्र)
मुंबई

Mumbai : दुकान नोंदणीसाठी सोसायटीच्या एनओसीचा आग्रह धरू नका; हायकोर्टाचे जिल्हाधिकाऱ्यांना आदेश

मरीन ड्राईव्ह येथील ‘सोना महाल को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी’मधील एका दुकानाची संमती डिक्री नोंदणी करण्याचे आदेश देताना उच्च न्यायालयाने महत्त्वपूर्ण निरीक्षण नोंदवले.

Swapnil S

मुंबई : मरीन ड्राईव्ह येथील ‘सोना महाल को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी’मधील एका दुकानाची संमती डिक्री नोंदणी करण्याचे आदेश देताना उच्च न्यायालयाने महत्त्वपूर्ण निरीक्षण नोंदवले. अशा प्रकरणांमध्ये नोंदणी करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी गृहनिर्माण सोसायटीकडून ‘ना-हरकत’ प्रमाणपत्र मागण्याचा आग्रह धरू नये, असे आदेश न्यायालयाने मुंबईच्या जिल्हाधिकाऱ्यांना दिले. न्यायमूर्ती सुमन श्याम आणि न्यायमूर्ती अद्वैत सेठना यांच्या खंडपीठाने हा निर्णय दिला.

संजय नारंग आणि रचना नारंग यांनी रिट याचिका दाखल केली होती. त्यावर न्या. सुमन श्याम यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठाने सुनावणी घेत निर्णय दिला. मरीन ड्राईव्ह येथील 'सोना महाल' इमारतीच्या तळमजल्यावर १८६ चौ. फुटांचे ‘पुष्प मिलन’ दुकान आणि त्याला लागून असलेली २५३० चौ. फुटांची रेस्टॉरंटची जागा यावरून वाद सुरू झाला होता. याचिकाकर्ते संजय आणि रचना नारंग यांनी मूळ मालकांकडून जागा खरेदीसाठी करार केला. उद्भवलेल्या वादानंतर उच्च न्यायालयात दावा दाखल करण्यात आला होता. त्यात १६ डिसेंबर २०२२ रोजी दोन्ही पक्षांच्या संमतीने कन्सेंट डिक्री मंजूर करण्यात आली.

या संमतीनाम्याला मालमत्ता हस्तांतरणाचा अंतिम दस्तावेज मानून याचिकाकर्त्यांनी मुद्रांक शुल्क देखील भरले होते. त्यानंतर याचिकाकर्ते संमतीनाम्याची अधिकृत नोंदणी करण्यासाठी गेले असता, दुकानाची जमीन शासकीय असल्याचे निदर्शनास आणून देत मुंबई जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित गृहनिर्माण सोसायटीकडून ‘ना-हरकत प्रमाणपत्र’ आणण्याची अट घातली होती. तथापि, सोसायटीने हे प्रमाणपत्र देण्यास नकार दिला होता. यावर याचिकाकर्त्यांच्या वकिलांनी आक्षेप घेतला. त्यांचा आक्षेप ग्राह्य धरत न्यायालयाने दुकानाच्या नोंदणीसाठी हाऊसिंग सोसायटीकडून एनओसी आणण्याचा आग्रह न धरण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांना दिले.

(इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

मुंबई महापालिकेच्या कारभारात ५० ‘फेलो’; स्थायी समिती अध्यक्ष, आयुक्तांसह खाते प्रमुखांच्या दिमतीसाठी नियुक्ती

दिव्यांगांसाठी पेन्शन योजना पुन्हा कार्यान्वित; मुंबईतील ५६ हजारांहून अधिक दिव्यांगांना दिलासा

Mumbai : विद्यार्थ्यांना परीक्षा कक्षात ३० मिनिटे अगोदर उपस्थित राहणे अनिवार्य

Mumbai : वांद्रे येथील मैदानाच्या आरक्षण बदलाचा प्रस्ताव मंजूर; नेव्हिल डिसूझा फुटबॉल मैदानावर प्रदर्शन व सेंटर उभारण्याचा मार्ग मोकळा

'सर्पदंश' अधिसूचित आजार; राज्य सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय