Mumbai : दहिसरमध्ये बेकायदा दुकाने तोडली; शिव वल्लभ रोडवरील अतिक्रमणांवर कारवाई 
मुंबई

Mumbai : दहिसरमध्ये बेकायदा दुकाने तोडली; शिव वल्लभ रोडवरील अतिक्रमणांवर कारवाई

मुंबई महापालिकेच्या ‘पादचारी प्रथम’ अभियानांतर्गत दहिसर पूर्व येथील बीट क्रमांक ५ मधील शिव वल्लभ रोड परिसरात अतिक्रमणविरोधी विशेष मोहीम राबविण्यात आली.

Swapnil S

मुंबई : मुंबई महापालिकेच्या ‘पादचारी प्रथम’ अभियानांतर्गत दहिसर पूर्व येथील बीट क्रमांक ५ मधील शिव वल्लभ रोड परिसरात अतिक्रमणविरोधी विशेष मोहीम राबविण्यात आली. या कारवाईत फुटपाथवरील विविध अतिक्रमणे, स्टॉल बेकायदा दुकानांवर हातोडा चालवण्यात आला.

सुरक्षित व सुलभ मार्ग

महापालिकेच्या संबंधित विभागाच्या पथकाने पोलिसांच्या मदतीने ही कारवाई केली. फुटपाथवर उभारण्यात आलेले अनधिकृत स्टॉल, फेरीविक्रेत्यांच्या संरचना, साहित्य तसेच पादचाऱ्यांच्या हालचालींना अडथळा ठरणारी इतर अतिक्रमणे हटविण्यात आली. त्यामुळे परिसरातील नागरिकांना सुरक्षित आणि सुलभ पादचारी मार्ग उपलब्ध झाला आहे.

मुंबई महापालिकेच्या आयुक्त अश्विनी भिडे यांनी पादचारी प्रथम अभियान हाती घेतले आहे. या अभियानांतर्गत दहिसर पूर्व येथे परिमंडळ ७ चे उपायुक्त मनिष वळंजु यांच्या मार्गदर्शनाखाली व आर उत्तरचे सहायक आयुक्त रोहित त्रिवेदी यांच्या नेतृत्वाखाली दहिसर पूर्वेकडील फुटपाथ अतिक्रमणमुक्तची कारवाई करण्यात आली.  ‘पादचारी प्रथम’ अभियानांतर्गत शहरातील विविध रस्ते आणि पदपथ अतिक्रमणमुक्त करण्यासाठी महापालिका सातत्याने कारवाई करत आहे. शाळा, रुग्णालये, बाजारपेठा आणि गर्दीच्या ठिकाणांजवळील पदपथ मोकळे करण्यावर विशेष भर दिला जात आहे.

महापालिका प्रशासनाने नागरिकांना फुटपाथवर कोणत्याही प्रकारचे अतिक्रमण न करण्याचे आवाहन केले असून, अतिक्रमणे आढळल्यास त्यांच्याविरोधात कठोर कारवाई सुरूच राहणार असल्याचा इशारा रोहित त्रिवेदी यांनी दिला आहे.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

Mira-Bhayandar : मेहतांच्या कंपनीची बांधकाम परवानगी रद्द; अधिकाऱ्यांवर कधी कारवाई होणार याची चर्चा

उपोषण मागे! सरकारशी चर्चेनंतर मनोज जरांगेंचा निर्णय; दिली तीन महिन्यांची अंतिम मुदत

डीजीपींच्या आदेशांचे उल्लंघन केल्यास केवळ ‘सौम्य शिक्षा’?; मुंबई उच्च न्यायालयाचा सवाल

महिलांची आज जपानशी सलामी! आशिया चषक विजेता भारतीय संघ आता आशियाई स्पर्धेच्या मोहिमेवर

आजचे राशिभविष्य, १८ सप्टेंबर २०२६ : जाणून घ्या तुमच्या दिवसाचे ग्रहसंकेत