मुंबईत मोठे आंतरराष्ट्रीय ड्रग्ज रॅकेट उद्ध्वस्त; ३४९ किलो कोकेन जप्त, किंमत १७४५ कोटी, अमित शहांकडून कौतुक  'एआय' ने बनविलेली प्रातिनिधिक प्रतिमा
मुंबई

मुंबईत मोठे आंतरराष्ट्रीय ड्रग्ज रॅकेट उद्ध्वस्त; ३४९ किलो कोकेन जप्त, किंमत १७४५ कोटी, अमित शहांकडून कौतुक

देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत मोठ्या आंतरराष्ट्रीय ड्रग्ज रॅकेटचा पर्दाफाश झाला असून ‘नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो’ने (एनसीबी) ३४९ किलो उच्च प्रतीचे कोकेन जप्त केले आहे.

Swapnil S

मुंबई : देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत मोठ्या आंतरराष्ट्रीय ड्रग्ज रॅकेटचा पर्दाफाश झाला असून ‘नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो’ने (एनसीबी) ३४९ किलो उच्च प्रतीचे कोकेन जप्त केले आहे. अधिकाऱ्यांनी मुंबईतील विविध ठिकाणी छापे टाकले. या कारवाईत मोठ्या प्रमाणावर कोकेन जप्त करण्यात आले. हा माल एका कंटेनरमध्ये चतुराईने लपवून दक्षिण अमेरिकेतून समुद्रमार्गे भारतात आणण्यात आला होता. या अमली पदार्थांची आंतरराष्ट्रीय बाजारातील किंमत सुमारे १७४५ कोटी रुपये असल्याचे वृत्त आहे. या कारवाईबद्दल केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी विशेष कौतुक करत ‘बॉटम टू टॉप’ तपासाचे हे उत्कृष्ट उदाहरण असल्याचे म्हटले आहे.

परदेशी नागरिकही ताब्यात

या प्रकरणी अनेक परदेशी नागरिकांसह एका मोठ्या ड्रग्ज सिंडिकेटच्या सदस्यांना ताब्यात घेण्यात आले असून त्यांची चौकशी सुरू आहे. मुंबईत झालेली ही कारवाई देशातील ड्रग्जविरोधी मोहिमेसाठी अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. ‘एनसीबी’च्या अधिकाऱ्यांनी एका लहान खेपेपासून तपास सुरू करत अखेर संपूर्ण आंतरराष्ट्रीय ड्रग्ज रॅकेटचा मागोवा घेतला. या तपासातून मोठ्या प्रमाणावर कोकेन साठा जप्त करण्यात यश आले. या कारवाईमुळे देशात सक्रिय असलेल्या ड्रग्ज नेटवर्कला मोठा धक्का बसल्याचे मानले जात आहे.

या प्रकरणावर प्रतिक्रिया व्यक्त करताना अमित शहा यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत स्पष्ट केले की, अमली पदार्थांच्या कार्टेल्सचा नायनाट करण्यासाठी केंद्र सरकार कटिबद्ध आहे. त्यांनी नमूद केले की,‘ एनसीबी’ने अत्यंत काटेकोर तपास करून लहान लहान पुराव्यांतून मोठ्या रॅकेटपर्यंत पोहोचत ही कारवाई केली आहे. हे ‘बॉटम टू टॉप’ तपासाचे उत्तम उदाहरण आहे. त्यांनी या यशासाठी ‘एनसीबी’च्या संपूर्ण पथकाचे अभिनंदन केले.

अत्याधुनिक ड्रग्ज टेस्टिंग मशीनचा वापर

दरम्यान, राज्यात अमली पदार्थांविरोधात कडक पावले उचलण्याची तयारीही सुरू झाली आहे. नागपूरमध्ये महाराष्ट्र दिनापासून अत्याधुनिक ड्रग्ज टेस्टिंग मशीनचा वापर सुरू करण्यात आला आहे. या तंत्रज्ञानामुळे रस्त्यावरच वाहनचालकांची तपासणी करता येणार असून, अमली पदार्थांचे सेवन केल्यास तत्काळ रिपोर्ट मिळणार आहे. त्यामुळे रेव्ह पार्टी किंवा रात्री उशिरा नशेत वाहन चालवणाऱ्यांवर थेट कारवाई करणे शक्य होणार आहे. या नव्या यंत्रणेमुळे पोलिसांना अधिक प्रभावीपणे कारवाई करता येणार आहे. ऑन-द-स्पॉट टेस्टिंगमुळे तपासाची प्रक्रिया जलद होणार असून दोषींवर त्वरित कारवाई शक्य होईल. नागपूरनंतर लवकरच मुंबई, पुणे आणि इतर प्रमुख शहरांमध्येही ही सुविधा सुरू करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. त्यामुळे राज्यभरात अमली पदार्थांविरोधात मोठी मोहीम राबवली जाणार आहे.

नवी मुंबईला 'धुक्याऐवजी' प्रदूषणाचा विळखा; पहाटे व्यायामाला आलेले नागरिक प्रदूषित हवेत, 'हेल्दी सिटी'च्या दाव्यांवर प्रश्नचिन्ह

Mumbai Rain : मुंबईसह वसई-विरारमध्ये मुसळधार पाऊस; अनेक भागांत पाणी साचलं, ऑरेंज अलर्ट जारी, VIDEO

Maratha Reservation : मनोज जरांगेंच्या आझाद मैदानातील आंदोलनाला मुंबई पोलिसांचा नकार; गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मोठा निर्णय

Rajapur : गणपतीसाठी कोकणात निघालेल्या चाकरमान्यांच्या गाडीला भीषण अपघात; ८-१० जण गंभीर जखमी, वाहनाचा चक्काचूर

Hartalika Teej 2026 : यंदा हरतालिका अन् गणेश चतुर्थी एकाच दिवशी; उपवास कधी सोडायचा? जाणून घ्या संपूर्ण माहिती