Mumbai : पेप्सी उद्यानात छत्रपतींचा भव्य अश्वारुढ पुतळा; पालिका सभागृहाची मंजुरी  प्रातिनिधिक छायाचित्र
मुंबई

Mumbai : पेप्सी उद्यानात छत्रपतींचा भव्य अश्वारुढ पुतळा; पालिका सभागृहाची मंजुरी

जोगेश्वरी पूर्व पेप्सी कंपाऊंड (गोडाऊन), पश्चिम द्रुतगती महामार्ग मुंबई उत्तर-पश्चिम लोकसभा मतदारसंघातील प्रभाग क्रमांक ७३ मधील पालिका उद्यानात छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य अश्वारूढ पुतळा उभारण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

Swapnil S

मुंबई : जोगेश्वरी पूर्व पेप्सी कंपाऊंड (गोडाऊन), पश्चिम द्रुतगती महामार्ग मुंबई उत्तर-पश्चिम लोकसभा मतदारसंघातील प्रभाग क्रमांक ७३ मधील पालिका उद्यानात छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य अश्वारूढ पुतळा उभारण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या प्रस्तावास पालिकेच्या सभागृहाची मंजुरी मिळाली आहे. खासदार रवींद्र वायकर यांच्या पाठपुराव्यामुळे त्यांची व शिवप्रेमींची ही अनेक वर्षांची मागणी आता पूर्ण होणार आहे.

मातोश्री आर्ट्स अँड स्पोर्ट्स ट्रस्टची जबाबदारी

हा अश्वारूढ पुतळा तयार असून, पुतळ्याची देखभाल, मांगल्य आणि पावित्र्य राखण्याची जबाबदारी ‘मातोश्री आर्ट्स अँड स्पोर्ट्स ट्रस्ट’ यांनी घेणार आहे. पालिका सभागृहात या प्रस्तावास अंतिम मंजुरी मिळाल्याने पुतळा उभारणीचा मार्ग मोकळा झाला असून जोगेश्वरी व उत्तर-पश्चिम मतदारसंघातील शिवप्रेमींमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

सलग नवव्या दिवशी सोन्याच्या दरात घसरण; सोने ५,२००, तर चांदी ४,००० रुपयांनी स्वस्त

मुंढवा जमीन व्यवहार प्रकरण : पार्थ पवार यांना दिलासा

प्रभादेवीत रेल्वेच्या कारवाईला स्थगिती; शिंदेंची केंद्रीय रेल्वे मंत्र्यांशी चर्चा; रहिवाशांचे पुनर्वसन करण्याचे निश्चित झाल्याची दिली माहिती

तडजोड करणारे पंतप्रधान जागतिक नेत्यांशी चर्चा कशी करणार? राहुल गांधींचे मोदींवर टीकास्त्र

गृहनिर्माण सोसायट्यांना दिलासा; ५० पेक्षा कमी सभासद संख्येच्या संस्थांची निवडणूक SGM मध्ये; महाराष्ट्र सहकारी संस्था नियमांत सुधारणा