मुंबई : कुर्ला पश्चिम रेल्वे स्थानक परिसर एलबीएस रोड काजू पाडा याठिकाणच्या फुटपाथवरील बेकायदा फेरीवाले, अनधिकृत स्टॉलवर पादचारी प्रथम अभियानांतर्गत कारवाईचा बडगा उगारण्यात आला. या कारवाईत ज्यूस सेंटर अनधिकृत बांधकामे व स्टॉलवर हातोडा फिरवला.
अतिक्रमण मुक्त फुटपाथ यासाठी मुंबई महापालिकेच्या आयुक्त अश्विनी भिडे यांनी पादचारी प्रथम अभियान हाती घेतले आहे. आयुक्त अश्विनी भिडे यांच्या आदेशानुसार मुंबई महापालिकेच्या २६ विभागीय कार्यालय क्षेत्रात अतिक्रमण मुक्त फुटपाथ अभियानाला धार आली आहे. मुंबई महापालिकेच्या २६ विभागीय कार्यालय क्षेत्रातील फुटपाथवरील बेकायदा बांधकामे स्टॉल तात्पुरत्या शेड हटवण्याचे काम वेगाने सुरु आहे. पादचारी प्रथम अभियानांतर्गत एल विभागात ही पादचारी प्रथम अभियानाला गती आली असून परिमंडळ ५ च्या उपायुक्त संध्या नांदेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि एल विभागाचे सहायक आयुक्त अनिल जाधव यांच्या नेतृत्वाखाली कुर्य्यातील फुटपाथ अतिक्रमण मुक्त ही मोहीम राबविण्यात येत आहेत.
एल विभागात मुंबई महापालिकेने अनधिकृत फेरीवाले व अतिक्रमणांविरोधात धडक कारवाई करत कुर्ला स्टेशन, एलबीएस रोड आणि काजूपाडा परिसरातील १० हून अधिक अनधिकृत स्टॉल्स व फेरीवाल्यांवर कारवाई केली. कारवाईदरम्यान कपडे, चप्पल, मोबाईल कव्हर्स, नारळ आणि इतर फेरीवाला मालही जप्त करण्यात आला. जप्त साहित्य पालिकेच्या गोदामात जमा करण्यात आले आहे.
रेल्वे स्थानक परिसर, पदपथ आणि प्रमुख रस्त्यांवरील अतिक्रमणांमुळे पादचाऱ्यांना होणारा त्रास लक्षात घेऊन ही मोहीम राबविण्यात आली. भविष्यातही अशा प्रकारच्या कारवाया सुरू राहणार असल्याचे एल विभागाचे सहायक आयुक्त अनिल जाधव यांनी सांगितले.
जप्त केलेला माल
हातगाड्या - ४, लाकडी बाकडे ३, ज्यूस स्टॉल २, छत्र्या - २, चहा काउंटर - १, पान स्टॉल साहित्य १, लोखंडी स्टँड १, नारळ २० व कपडे, चप्पल, मोबाईल कव्हर्स आदी माल जप्त करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. साहित्य - ३, सिलिंडर २, शेगड्या