Mumbai : लालबाग-परळमध्ये विशेष सज्जता; प्लास्टिक बाटल्यांसाठी सात ठिकाणी बास्केट संग्रहित छायाचित्र
मुंबई

Mumbai : लालबाग-परळमध्ये विशेष सज्जता; प्लास्टिक बाटल्यांसाठी सात ठिकाणी बास्केट

गणपती बाप्पा मोरया'चा जयघोष करत सोमवारपासून मुंबईत सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांसह घरगुती गणरायांचे आगमन झाले आहे.

Swapnil S

मुंबई : गणपती बाप्पा मोरया'चा जयघोष करत सोमवारपासून मुंबईत सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांसह घरगुती गणरायांचे आगमन झाले आहे. गणेशोत्सवात लाखो भाविकांची गर्दी होणाऱ्या लालबाग-परळ, हिंदमाता परिसरातही गणेशभक्तांच्या स्वागतासाठी मुंबई महापालिकेने जय्यत तयारी केली आहे. गर्दीच्या काळात कचरा आणि अस्वच्छता निर्माण होऊ नये यासाठी स्वच्छतेवर अधिक भर देण्यात आला असून ५० महापालिका सफाई कामगारांसह स्वयंसेवी संस्थांचे ६० कर्मचारी तैनात आहेत.

कचराकुंड्यांची संख्या वाढवली

लालबाग-परळ परिसरात पिण्याच्या पाण्याच्या प्लास्टिक बाटल्यांचा वापर होतो. त्यामुळे रिकाम्या बाटल्या रस्त्यावर न पडता त्या स्वतंत्रपणे जमा व्हाव्यात, यासाठी एफ दक्षिण विभागात प्रथमच सात ठिकाणी विशेष बास्केट डबे बसवले आहेत. या डब्यांमध्ये केवळ प्लास्टिकच्या बाटल्या जमा करता येणार आहेत. गेल्या वर्षी या परिसरात तुलनेने कमी क्षमतेचे कचराकुंडे ठेवण्यात आले होते. यंदा गर्दी आणि कचऱ्याचे प्रमाण लक्षात घेऊन मोठ्या क्षमतेच्या कचराकुंड्यांची संख्या वाढवण्यात आली आहे. त्यामुळे भाविकांनी कचरा रस्त्यावर न टाकता उपलब्ध करून दिलेल्या कचराकुंड्यांचा वापर करावा, असे आवाहन महापालिकेने केले आहे.

लालबागचा राजा, गणेशगल्ली, चिंतामणी, तेजुकाया, परळचा राजा, रंगारी बदक चाळ यांसह विविध गणेश मंडळांच्या दर्शनासाठी लाखो भाविक लालबाग-परळ परिसरात दाखल होतात. त्यामुळे या परिसरात गणेशोत्सवाच्या दहा दिवसांत मोठ्या प्रमाणात घनकचरा निर्माण होतो. रस्त्यांवर कचरा साचू नये आणि भाविकांना स्वच्छ परिसर

उपलब्ध व्हावा यासाठी एफ दक्षिण विभागाने विशेष स्वच्छता व्यवस्था केली आहे. घनकचरा व्यवस्थापन विभागाकडून दररोज कचरा उचलण्यावर विशेष भर देण्यात येणार आहे. यासाठी ५० सफाई कामगार, सहा मुकादम, स्वयंसेवी संस्थांचे ६० कर्मचारी, कचरा वाहतुकीसाठी सहा मिनी कॉम्पेक्टर आणि चार मोठे कॉम्पेक्टर सज्ज ठेवण्यात आले आहेत.

(संबंधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

आजचे राशिभविष्य, १५ सप्टेंबर २०२६ : जाणून घ्या तुमच्या दिवसाचे ग्रहसंकेत

गौरी-गणपतीच्या नैवेद्यासाठी करा आलू मटारची भाजी; मोजक्या साहित्यात बनवा झटपट रेसिपी

Ganeshotsav 2026 : मोदकापासून पुरणपोळीपर्यंत; जाणून घ्या बाप्पाच्या नैवेद्यातील खास पदार्थ

बाप्पाच्या स्वागताला ज्ञानदा रामतीर्थकरचा मराठमोळा अंदाज; पारंपरिक लूकने वेधलं लक्ष

श्रिया पिळगावकरचा रंगीबेरंगी अंदाज; 'मिर्झापूर'च्या स्वीटीचा ग्लॅमरस लूक व्हायरल