Mumbai : 'लक्ष्मी निवास 'च्या जागी २१ मजली टॉवर होणार 
मुंबई

Mumbai : 'लक्ष्मी निवास 'च्या जागी २१ मजली टॉवर होणार

दक्षिण मुंबईतील मलबार हिल परिसर आणि नेपियन सी रोडवरील दोन महत्त्वपूर्ण घडामोडी समोर आल्या आहेत.

प्रतिनिधी

स्वीटी भागवत

मुंबई : दक्षिण मुंबईतील मलबार हिल परिसर आणि नेपियन सी रोडवरील दोन महत्त्वपूर्ण घडामोडी समोर आल्या आहेत. एका बाजूला स्वातंत्र्याशी ऐतिहासिक संबंध असलेला 'लक्ष्मी निवास' हा बंगला पाडून तेथे एक भव्य २१ मजली निवासी टॉवर उभारला जाणार आहे, तर दुसऱ्या बाजूला वाळकेश्वर येथील प्रसिद्ध 'रुईया हाऊस'मध्ये एका शाही विवाहासाठी तात्पुरता प्लॅटफॉर्म उभारण्यास सागरी क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरणाने परवानगी दिली आहे.

'रुईया हाऊस'मध्ये शाही विवाहाचा थाट

वाळकेश्वर (मलबार हिल) येथील उद्योगपती रुईया कुटुंबाच्या मालकीच्या 'रुईया हाऊस' या प्रसिद्ध बंगल्यात एका भव्य विवाहाचे आयोजन करण्यात आले आहे. या सोहळ्यासाठी उभारण्यात येणाऱ्या तात्पुरत्या 'इव्हेंट प्लॅटफॉर्म'ला एमसीझेडएमएने मंजुरी दिली आहे.

१ सप्टेंबर २०२६ रोजी हा तात्पुरता मंच उभारला जाईल आणि १२ डिसेंबर २०२६ पर्यंत (१०३ दिवस) तो तेथे राहील. विवाहसोहळा पार पडल्यानंतर हा मंच पूर्णपणे काढून टाकून ती जागा मूळ स्थितीत आणावी लागेल.

(संबंधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

गणपती सजावटीला 'चिनी' मालाचा झगमगाट; बाजारात स्वस्त साहित्याला पसंती, धारावी, भिवंडीच्या प्लास्टिक फुलांनाही मागणी

भरती परीक्षेतील सुधारणांसाठी उच्चस्तरीय समिती; सामान्य प्रशासन विभागाचा शासन निर्णय जारी

वीजनिर्मिती केंद्रांमध्ये ९ दिवसांचाच कोळसा?

पुण्यात दहीहंडीची कमान कोसळून महिला ठार, CCTV मध्ये घटना कैद

Dahi Handi 2026 : उत्सवाला गालबोट! दोन ठार; २०० गोविंदा जखमी; अनेकांच्या डोक्याला-मणक्याला मार