रेल्वे अधिकाऱ्यांच्या राजीनाम्यासाठी दबाव; महाव्यवस्थापक, डीआरएमवर कारवाईची वकिलाची मागणी Photo: X
मुंबई

रेल्वे अधिकाऱ्यांच्या राजीनाम्यासाठी दबाव; महाव्यवस्थापक, डीआरएमवर कारवाईची वकिलाची मागणी

सीएसएमटी स्थानकात झालेल्या आंदोलनानंतर सँडहर्स्ट रोड येथे झालेल्या लोकल अपघातात दोन प्रवाशांचा मृत्यू झाला. या घटनेची जबाबदारी स्वीकारून मध्य रेल्वेच्या महाव्यवस्थापक आणि मुंबई विभागाच्या विभागीय रेल्वे व्यवस्थापकांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी वकील कांचन घनशानी यांनी केली आहे.

Swapnil S

मुंबई : सीएसएमटी स्थानकात झालेल्या आंदोलनानंतर सँडहर्स्ट रोड येथे झालेल्या लोकल अपघातात दोन प्रवाशांचा मृत्यू झाला. या घटनेची जबाबदारी स्वीकारून मध्य रेल्वेच्या महाव्यवस्थापक आणि मुंबई विभागाच्या विभागीय रेल्वे व्यवस्थापकांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी वकील कांचन घनशानी यांनी केली आहे.

मुंब्रा दुर्घटनेप्रकरणी मध्य रेल्वेचे वरिष्ठ विभागीय अभियंता समर यादव आणि साहाय्यक विभागीय अभियंता विशाल डोळस यांच्याविरोधात ठाणे रेल्वे पोलिसांनी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला आहे. अभियंत्यांवर दाखल करण्यात आलेलले गुन्हे मागे घ्यावेत या मागणीसाठी सेंट्रल रेल्वे मजदूर युनियनने गुरुवारी सीएसएमटी स्थानकात आंदोलन सुरू केले. या आंदोलकांमुळे सीएसएमटी येथे जवळजवळ एक तास लोकल खोळंबल्या होत्या.

लोकल सुरू झाल्यानंतर अंबरनाथ जलद लोकलने सँडहर्स्ट रोड येथे लोकलच्या धडकेत पाच प्रवासी जखमी झाले. परंतु, उपचारादरम्यान दोन प्रवाशांचा मृत्यू झाला.

याप्रकरणी सीएसएमटी रेल्वे पोलिसांना अत्यावश्यक सेवा देखभाल कायद्यांतर्गत (ईएसएमए) गुन्हा नोंदवण्याची आणि सहभागी असलेल्या सर्व कर्मचाऱ्यांची ओळख पटविण्यासाठी सीसीटीव्ही चित्रीकरण तपासण्याची मागणी घनशानी यांनी केली आहे. तसेच खासदार मिलिंद देवरा यांनी ७नोव्हेंबर रोजी केंद्रीय रेल्वे मंत्री

अश्विनी वैष्णव यांना पत्र लिहून सँडहर्स्ट रोड स्थानकातील घटनेची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे. तसेच या घटनेसाठी जबाबदार असलेल्यांना अधिकारी कर्मचाऱ्यांना शिक्षा करावी, अशी मागणी देवरा यांनी केली आहे.

BMC त सहाय्यक आयुक्त पदावर नेमणूक; पूर्णकालिक तत्त्वावरील पदासाठी १२ अर्ज दाखल; १० व १२ नोव्हेंबर रोजी होणार मुलाखत

१ ते १९ डिसेंबर या संसदेचे कालावधीत हिवाळी अधिवेशन

एसटीच्या तिकीट महसुलात सरासरी दैनंदिन तूट; अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी

बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपींचा जामीन अर्ज फेटाळला; २७ वर्षांपासून फरार असल्याने विशेष न्यायालयाने दिला झटका

एअर इंडिया विमान अपघात, तुमच्या मुलाचा दोष नाही; सुप्रीम कोर्टाने केले स्पष्ट