संग्रहित छायाचित्र 
मुंबई

Mumbai Local Mega Block Update : प्रवाशांनो लक्ष द्या...रविवारी तिन्ही रेल्वे मार्गांवर ब्लॉक, जाणून घ्या डिटेल्स

Swapnil S

मुंबई : अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे करण्यासाठी मध्य रेल्वेने रविवारी मेगाब्लॉक घेतला आहे. तर, गोरेगाव ते कांदिवली स्थानकादरम्यान सहाव्या मार्गिकेच्या कामासाठी पश्चिम रेल्वेवरही शनिवार रात्रीपासूनच १० तासांचा ब्लॉक घेण्यात येणार आहे.

मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावर ठाणे आणि कल्याण स्थानकांदरम्यान सकाळी १०.४० ते दुपारी ३.४० पर्यंत अप आणि डाऊन जलद मार्गावर ब्लॉक असेल. तर पनवेल आणि वाशी स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन हार्बर मार्गावर सकाळी ११.०५ ते सायंकाळी ४.०५ पर्यंत ब्लॉक असेल.

मुख्य मार्गावर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सकाळी ९.३४ ते दुपारी ०३.०३ पर्यंत सुटणाऱ्या डाऊन जलद/अर्ध-जलद लोकल ठाणे आणि कल्याण स्थानकांदरम्यान डाऊन धीम्या मार्गावर वळवण्यात येतील. तसेच थांब्यांव्यतिरिक्त कळवा, मुंब्रा आणि दिवा स्थानकांवर थांबतील.

सीएसएमटी/दादर येथून सुटणाऱ्या डाऊन मेल/एक्स्प्रेस गाड्या ठाणे आणि कल्याण स्थानकांदरम्यान पाचव्या मार्गावर वळवण्यात येतील. सीएसएमटी /दादर येथे येणाऱ्या अप मेल/एक्स्प्रेस गाड्या कल्याण आणि ठाणे/विक्रोळी स्थानकांदरम्यान सहाव्या मार्गावर वळवण्यात येतील.

पश्चिम रेल्वेवर १० तासांचा ब्लॉक

गोरेगाव ते कांदिवली स्थानकादरम्यान सहाव्या मार्गिकेचे काम सुरू आहे. या कामासाठी शनिवारी रात्री ११ ते रविवारी सकाळी ९ वाजेपर्यंत १० तासांचा ब्लॉक घेण्यात येणार आहे. तसेच कांदिवली ते गोरेगाव दरम्यान अप जलद मार्गावर रात्री ११ ते रात्री ३.३० वाजेपर्यंत ४.३० तासांचा ब्लॉक असेल. या ब्लॉकमुळे अनेक लोकल रद्द करण्यात आल्या असून काही लोकलच्या वेळेत बदल केला आहे. शनिवारी रात्री १०.४४ वाजता विरार-अंधेरी जलद वातानुकूलित लोकल बोरिवलीपर्यंत धावेल. रात्री ११:५५ वाजता अंधेरी-भाईंदर जलद वातानुकूलित लोकल रात्री ११.२५ वाजता बोरिवलीवरून चालवण्यात येईल.

पंतप्रधान मोदींच्या हस्ते आज Metro-3 चे उद्घाटन; अंतर्गत रिंग मेट्रो, ठाणे पालिकेच्या नवीन इमारतीचेही भूमिपूजन

पुणे : बोपदेव घाटात तरुणीवर सामूहिक बलात्कार; पोलिसांकडून संशयित आरोपींचे स्केच जारी

निराधार दुर्गांची जीवनभरारी! बालगृहातील भगिनी ते अधीक्षिका; सांगलीच्या सपनाचा स्फूर्तिदायी प्रवास

इस्त्रायलचा खात्मा करणार; इराणचे सर्वोच्च नेते खामेनी यांची गर्जना

विधानसभा निवडणुकीआधी शरद पवारांचा भाजपला मोठा धक्का! हर्षवर्धन पाटील 'तुतारी' हाती घेणार