संग्रहित छायाचित्र ANI
मुंबई

मुंबई : प्रवाशांनो लक्ष द्या...उद्या तिन्ही रेल्वे मार्गांवर मेगाब्लॉक

रेल्वेरूळ, सिग्नल यंत्रणा आणि अभियांत्रिकी कामांसाठी मध्य, हार्बर आणि पश्चिम रेल्वे मार्गांवर रविवारी मेगाब्लॉक घेतला आहे.

Swapnil S

मुंबई : रेल्वेरूळ, सिग्नल यंत्रणा आणि अभियांत्रिकी कामांसाठी मध्य, हार्बर आणि पश्चिम रेल्वे मार्गांवर रविवारी मेगाब्लॉक घेतला आहे. मध्य रेल्वेच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) ते विद्याविहार दरम्यान अप आणि डाऊन धीमा मार्ग, सीएसएमटी-चुनाभट्टी/वांद्रे डाऊन हार्बर मार्गावर आणि चुनाभट्टी/वांद्रे-सीएसएमटी अप हार्बर मार्गावर ब्लॉक घेण्यात आला आहे. तर पश्चिम रेल्वेच्या हार्बर मार्गावर माहीम आणि गोरेगाव स्थानकादरम्यान ब्लॉक घेण्यात आला आहे. यामुळे रविवारी कामानिमित्त रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांचे हाल होणार आहेत.

मध्य रेल्वेवर रविवारी सकाळी १०.५५ ते दुपारी ३.२५ पर्यंत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते विद्याविहार दरम्यान अप आणि डाऊन धीम्या मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात आला आहे. तसेच सीएसएमटी - चुनाभट्टी / वांद्रे डाऊन हार्बर मार्गावर सकाळी ११.४० ते दुपारी ४.४० वाजेपर्यंत आणि चुनाभट्टी / वांद्रे- सीएसएमटी अप हार्बर मार्गावर सकाळी ११.१० ते दुपारी ४.१० वाजेपर्यंत ब्लॉक असेल.

ब्लॉक कालावधीत सीएसएमटी येथून सकाळी १०.४८ ते दुपारी ३.२४ पर्यंत सुटणाऱ्या डाऊन धीम्या लोकल सीएसएमटी आणि विद्याविहार स्थानकांदरम्यान डाऊन जलद मार्गावर वळवण्यात येणार आहेत. त्यामुळे धीम्या मार्गावरील गाड्या भायखळा, परळ, दादर, माटुंगा, शीव आणि कुर्ला स्थानकावर थांबतील. घाटकोपर येथून सकाळी १०.४१ ते दुपारी ३.१० पर्यंत सुटणाऱ्या अप धीम्या मार्गावरील लोकल विद्याविहार आणि सीएसएमटी स्थानकांदरम्यान अप जलद मार्गावर वळवण्यात येणार आहेत. या सेवा कुर्ला, शीव, माटुंगा, दादर, परळ आणि भायखळा स्थानकावर थांबणार आहेत.

सीएसएमटीसाठी/वडाळा रोड येथून सकाळी ११.१६ ते दुपारी ४.४७ दरम्यान वाशी/बेलापूर/पनवेलसाठी सुटणाऱ्या डाऊन हार्बर मार्गावरील लोकल बंद राहणार आहेत. तर सीएसएमटी स्थानकातून सकाळी १०.४८ ते दुपारी ४.४३ वाजेपर्यंत सुटणाऱ्या वांद्रे/ गोरेगाव डाऊन हार्बर मार्गावरील लोकल बंद ठेवण्यात आल्या आहेत. ब्लॉक कालावधीत सीएसएमटी-कुर्ला आणि पनवेल-वाशी विभागांदरम्यान विशेष लोकल चालविण्यात येणार आहेत.

पश्चिम रेल्वेचा ब्लॉक

पश्चिम रेल्वेने हार्बर मार्गावर माहीम आणि गोरेगाव स्थानकादरम्यान सकाळी ११ ते दुपारी ४ दरम्यान ब्लॉक घेतला आहे. ब्लॉक कालावधीत सीएसएमटी-वांद्रे-सीएसएमटी, सीएसएमटी-पनवेल-गोरेगाव- सीएसएमटी/पनवेल-गोरेगाव- सीएसएमटी/पनवेलसोबत चर्चगेट - गोरेगाव-चर्चगेट लोकल रद्द केल्या आहेत.

Maharashtra Assembly Elections Results 2024 LIVE: महाराष्ट्राचा महानिकाल! एकाच क्लिकवर बघा कल आणि निकाल

अपक्ष, बंडखोरांसाठी रस्सीखेच; महायुती, महाआघाडीत खलबते

राहुल गांधी, खर्गे यांनी माफी मागावी, अन्यथा कारवाईला सामोरे जावे; विनोद तावडे यांची नोटीस

...तोपर्यंत मतमोजणी केंद्र सोडू नका; शरद पवारांचा उमेदवारांना आदेश

झारखंडमध्ये आज मतमोजणी