मुंबई

Mumbai: लोकल प्रवाशांनो लक्ष द्या...उद्या मेगाब्लॉक; मेमू सेवाही स्थगित; वाचा सविस्तर

प्रवाशांच्या गैरसोयीबद्दल रेल्वे प्रशासनाने दिलगीरी व्यक्त केली आहे.

Swapnil S

मुंबई : अभियांत्रिकी आणि देखभालीच्या कामांसाठी मध्य रेल्वेने रविवारी उपनगरीय विभागांवर मेगाब्लॉक घेतला आहे. मुख्य मार्गावर ठाणे ते कल्याण दरम्यान पाचवी आणि सहावी मार्गिका तसेच हार्बर मार्गावर पनवेल आणि वाशी स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन मार्गावर ब्लॉक घेण्यात आल्याने रविवारी लोकल विलंबाने धावणार आहेत.

ठाणे ते कल्याण दरम्यान पाचवी आणि सहाव्या मार्गिकवर सकाळी ९ ते दुपारी १ या वेळेत ब्लॉक घेण्यात येणार आहे. या कामामुळे अप मेल/एक्स्प्रेस गाड्या वळविण्यात आल्या आहेत.

पनवेल आणि वाशी स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन हार्बर मार्गावर सकाळी ११.०५ ते सायंकाळी ४.०५ पर्यंत ब्लॉक घेण्यात आला आहे. त्यामुळे पनवेल येथून सकाळी १०.३३ ते दुपारी ३.४९ वाजेपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई करीता सुटणाऱ्या अप हार्बर मार्गावरील सेवा आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सकाळी ९.४५ ते दुपारी ३.१२ वाजेपर्यंत पनवेल/बेलापूरकडे जाणाऱ्या डाउन हार्बर मार्गावरील सेवा रद्द राहतील. तसेच पनवेल येथून सकाळी ११.०२ ते दुपारी ३.५३ वाजेपर्यंत ठाणे येथे जाणाऱ्या अप ट्रान्सहार्बर मार्गावरील सेवा आणि ठाणे येथून सकाळी १०.०१ ते दुपारी ३.२० पर्यंत पनवेल येथे जाणाऱ्या डाऊन ट्रान्सहार्बर मार्गावरील सेवा रद्द करण्यात येणार आहेत. ब्लॉक कालावधीत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई-वाशी मार्गावर विशेष लोकल चालविण्यात येणार आहेत. तर ब्लॉक कालावधीत ठाणे-वाशी/नेरूळ स्थानकांदरम्यान ट्रान्सहार्बर लाईन सेवा उपलब्ध असेल. ब्लॉक कालावधीत बेलापूर/नेरूळ आणि उरण स्थानकांदरम्यान पोर्ट लाईन सेवा उपलब्ध असेल.

पश्चिम रेल्वेचा ब्लॉक

पश्चिम रेल्वे मार्गावर बोरिवली ते राम मंदिर स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन जलद मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात आला आहे. सकाळी १० ते दुपारी ३ वाजेपर्यंत हा ब्लॉक असेल. ब्लॉक कालावधीत डाऊन मार्गावरील जलद लोकल बोरिवली ते अंधेरी स्थानकादरम्यान धिम्या मार्गावरून चालविण्यात येणार आहेत.

मेमू सेवा स्थगित

-मेमू क्रमांक ०१३३९ वसई रोड- दिवा सकाळी ०९.५० वाजता वसई रोडवरून कोपरपर्यंत असेल आणि कोपर आणि दिवा स्थानकांदरम्यान रद्द राहील.

-मेमू क्रमांक ०१३४० कोपर येथून सकाळी ११.४५ वाजता सुटेल आणि वसई रोड येथे दुपारी १२.३० वाजता पोहोचेल आणि दिवा आणि कोपर स्थानकांदरम्यान रद्द राहील.

प्रवाशांच्या गैरसोयीबद्दल मध्य रेल्वे प्रशासनाने दिलगीरी व्यक्त केली आहे.

Maharashtra Assembly Elections Results 2024 LIVE: महाराष्ट्राचा महानिकाल! एकाच क्लिकवर बघा कल आणि निकाल

अपक्ष, बंडखोरांसाठी रस्सीखेच; महायुती, महाआघाडीत खलबते

राहुल गांधी, खर्गे यांनी माफी मागावी, अन्यथा कारवाईला सामोरे जावे; विनोद तावडे यांची नोटीस

...तोपर्यंत मतमोजणी केंद्र सोडू नका; शरद पवारांचा उमेदवारांना आदेश

झारखंडमध्ये आज मतमोजणी