(संग्रहित छायाचित्र) ANI
मुंबई

रविवारी मध्य, हार्बर मार्गावर मेगाब्लॉक; प्रवाशांचे हाल होणार; पश्चिम रेल्वेवर शनिवारी रात्रीचा ब्लॉक

Swapnil S

मुंबई : अभियांत्रिकी आणि देखभाल दुरुस्तीची कामे पूर्ण करण्यासाठी मध्य रेल्वेने उपनगरीय विभागांवर रविवारी मेगाब्लॉक घेतला आहे. मुख्य मार्गावर ठाणे ते दिवा दरम्यान ५ वी आणि ६ वी मार्गिका सकाळी १०.५० ते दुपारी ३.२० पर्यंत मेगाब्लॉक असेल. तर हार्बर मार्गावर कुर्ला आणि वाशी स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन हार्बर मार्गावर ब्लॉक घेण्यात आला आहे. ब्लॉक कालावधीत लोकल विलंबाने धावणार असल्याने प्रवाशांचे हाल होणार आहेत.

ब्लॉक कालावधीत डाऊन जलद/सेमी जलद बदलापूर लोकल छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून ०९.४६ वाजता सुटेल. आसनगाव लोकल छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून ०२.४२ वाजता सुटेल. ही लोकल ठाणे आणि कल्याण स्थानकांदरम्यान डाऊन धीम्या मार्गावर वळवण्यात येतील आणि त्याव्यतिरिक्त कळवा, मुंब्रा आणि दिवा स्थानकावर थांबतील. या लोकल नियोजित थांब्यापर्यंत आणि नियोजित आगमनापेक्षा १० मिनिटांनी गंतव्य स्थानावर पोहचतील.

सकाळी ११.१० ते दुपारी ४.१० पर्यंत कुर्ला आणि वाशी स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन हार्बर मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात आला आहे. पनवेल/ बेलापूर/ वाशीसाठी सकाळी १०.३४ ते दुपारी ३.३६ पर्यंत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईकडे जाणाऱ्या डाऊन हार्बर मार्गावरील सेवा आणि सकाळी १०.१६ ते दुपारी ३.४७ वाजेपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईकडे सुटणाऱ्या पनवेल / बेलापूर/ वाशीकडे जाणाऱ्या अप हार्बर मार्गावरील सेवा रद्द राहतील. ब्लॉक कालावधीत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई-कुर्ला आणि पनवेल-वाशी या भागांवर विशेष उपनगरीय गाड्या धावतील. ब्लॉक कालावधीत हार्बर मार्गावरील प्रवाशांना ठाणे-वाशी/नेरूळ स्थानकांदरम्यान सकाळी १०.०० ते संध्याकाळी ६.०० वाजेपर्यंत प्रवास करण्याची परवानगी आहे. तर ब्लॉक कालावधीत हार्बर मार्गावरील प्रवाशांना ठाणे-वाशी/नेरूळ स्थानकांदरम्यान सकाळी १०.०० ते संध्याकाळी ६.०० वाजेपर्यंत प्रवास करण्याची परवानगी आहे.

पश्चिम रेल्वेवर शनिवारी रात्रीचा ब्लॉक

पश्चिम रेल्वेकडून १३/१४ जुलै च्या मध्यरात्री १२.१५ ते पहाटे ४.१५ पर्यंत मुंबई सेंट्रल आणि माहीम स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन जलद मार्गावर चार तासांचा जंबो ट्रॅक, सिग्नलिंग सिस्टम आणि ओव्हरहेड उपकरणांच्या देखभालीसाठी घेतला आहे. ब्लॉक कालावधीत, सर्व जलद मार्गावरील गाड्या सांताक्रुझ आणि चर्चगेट स्थानकांदरम्यान धिम्या मार्गावर चालवल्या जातील. परिणामी, रविवार १४ जुलै रोजी पश्चिम रेल्वेच्या उपनगरीय विभागात दिवसा ब्लॉक असणार नाही.

अप हार्बर मार्गावर

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईसाठी ब्लॉकपूर्वीची शेवटची लोकल सकाळी १०.०५ वाजता पनवेल येथून सुटणार आहे.

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईसाठी ब्लॉकनंतर पहिली लोकल दुपारी ३.४५ वाजता पनवेल येथून सुटणार आहे.

हे मेंटेनन्स मेगा ब्लॉक्स पायाभूत सुविधांच्या देखभालीसाठी आणि सुरक्षिततेसाठी आवश्यक आहेत. प्रवाशांना विनंती करण्यात आली आहे की, त्यामुळे होणाऱ्या गैरसोयीबद्दल रेल्वे प्रशासनाला सहकार्य करावे.

डाऊन हार्बर मार्गावर

ब्लॉकपूर्वीची शेवटची लोकल पनवेल लोकल असेल जी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सकाळी १०.१८ वाजता सुटेल.

ब्लॉकनंतर पहिली लोकल पनवेल लोकल छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून दुपारी ३.४४ वाजता सुटेल.

अप मेल/एक्स्प्रेस गाड्यांचे वळण

पुढील अप मेल/एक्स्प्रेस गाड्या कल्याण आणि ठाणे स्थानकांदरम्यान अप जलद मार्गावर वळवल्या जातील आणि गंतव्य स्थानावर १० ते १५ मिनिटे उशिरा पोहोचतील.

राज्यात 'महिला राज'ची चर्चा; सुप्रिया सुळे, रश्मी ठाकरे यांची नावे मुख्यमंत्रीपदासाठी चर्चेत

मुरबाडच्या जागेवर शिवसेना ठाकरे गटाचाही दावा; महाविकास आघाडीत रस्सीखेच वाढणार!

हिरे क्षेत्र गंभीर संकटात; गेल्या तीन वर्षांत आयात-निर्यातीत मोठी घट,'जीटीआरआय’चा दावा

नव्या सरकारच्या स्वागतासाठी मंत्रालयात स्वच्छता मोहीम

‘मला काहीतरी सांगायचंय’; मुख्यमंत्र्यांच्या जीवनावरील नाटक, लवकरच येणार प्रेक्षकांच्या भेटीला