मुंबई

मध्य रेल्वेचा प्रवाशांना धक्का; कर्जत-कसारा शेवटची लोकल ६ ते १२ मिनिटे अगोदर सुटणार, ५ ऑक्टोबरपासून नवीन वेळापत्रक

नवीन वेळापत्रकानुसार या लोकल ६ ते १२ मिनिटे अगोदर सुटणार असल्याने उशिरा कामावरून सुटणाऱ्या प्रवाशांची या लोकल पकडताना चांगलीच दमछाक होणार आहे.

Swapnil S

मुंबई : मध्य रेल्वेने लोकलचे नवीन वेळापत्रक जाहीर केले आहे. हे वेळापत्रक ५ऑक्टोबरपासून लागू होणार आहे. या वेळापत्रकानुसार रात्री छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसमधून रात्री शेवटच्या सुटणाऱ्या कर्जत व कसारा लोकलच्या वेळांमध्ये बदल करत प्रवाशांना धक्का दिला आहे. नवीन वेळापत्रकानुसार या लोकल ६ ते १२ मिनिटे अगोदर सुटणार असल्याने उशिरा कामावरून सुटणाऱ्या प्रवाशांची या लोकल पकडताना चांगलीच दमछाक होणार आहे.

सध्या सीएसएमटी ते कसारा शेवटची लोकल रात्री १२.१४ वाजता सुटते. तसेच सीएसएमटी ते कर्जत शेवटची लोकल रात्री १२.२४ वाजता सुटते. या लोकल पकडण्यासाठी प्रवाशांची मोठी धावपळ होते. त्यामुळे अनेकांना रेल्वे स्थानकात मुक्काम करावा लागतो किवा पर्यायी मार्गाने प्रवास करावा लागतो. अशातच मध्य रेल्वेचे ५ ऑक्टोबरपासून नवीन वेळापत्रक लागू होणार आहे. या वेळापत्रकानुसार, सीएसएमटी ते कसारा शेवटची लोकल रात्री १२.०८ वाजता असेल, तर सीएसएमटी ते कर्जत शेवटची लोकल रात्री १२.१२ वाजता असणार आहे. या दोन्ही लोकल सध्याच्या वेळेच्या तुलनेत ६ आणि १२ मिनिटे अगोदर सुटतील. त्यामुळे या लोकल पकडण्यासाठी प्रवाशांना धावपळ करावी लागणार आहे.

त्याचप्रमाणे दादर येथून २४ अप आणि डाऊन लोकल फेऱ्या परळपर्यंत विस्तारित केल्या आहेत. तर सीएसएमटी ते ठाणे स्थानकादरम्यान चालवण्यात येणाऱ्या ६ अप आणि डाऊन लोकल फेऱ्या कल्याणपर्यंत विस्तारित करण्यात आल्या आहेत. तसेच सीएसएमटीपर्यंत येणाऱ्या २२ अप आणि डाऊन जलद लोकल फेऱ्या दादरपर्यंत चालवण्यात येतील आणि दादरवरूनच डाऊन दिशेला रवाना होतील. या फेऱ्या दादर येथून नवीन फलाट क्रमांक ११ वरुन चालवण्यात येणार आहेत.

जलद लोकलला कळवा, मुंब्रा येथे थांबा

गर्दीच्यावेळी जलद लोकलला कळवा, मुंब्रा येथे थांबा मिळणार आहे. कळवा येथे सकाळी ८.५६ वाजता आणि मुंब्रा येथे सकाळी ९.२३ वाजता जलद लोकल थांबेल. तर कळवा येथे सायंकाळी ७.२९ वाजता आणि मुंब्रा येथे सायंकाळी ७.४७ वाजता जलद लोकलचे अतिरिक्त थांबे निश्चित करण्यात आले आहेत.

Maharashtra Assembly Elections Results 2024 LIVE: महाराष्ट्राचा महानिकाल! एकाच क्लिकवर बघा कल आणि निकाल

अपक्ष, बंडखोरांसाठी रस्सीखेच; महायुती, महाआघाडीत खलबते

राहुल गांधी, खर्गे यांनी माफी मागावी, अन्यथा कारवाईला सामोरे जावे; विनोद तावडे यांची नोटीस

...तोपर्यंत मतमोजणी केंद्र सोडू नका; शरद पवारांचा उमेदवारांना आदेश

झारखंडमध्ये आज मतमोजणी