मुंबई

मुंबईकरांनो लक्ष द्या; पश्चिम रेल्वे मार्गावर १६ आणि १७ नोव्हेंबरला १२ तासांचा ब्लॉक

पश्चिम रेल्वेवरील जोगेश्वरी आणि गोरेगाव स्थानकादरम्यान उभारण्यात येत असलेल्या पुलाच्या कामासाठी १२ तासांचा ब्लॉक...

Swapnil S

मुंबई : पश्चिम रेल्वेवरील जोगेश्वरी आणि गोरेगाव स्थानकादरम्यान उभारण्यात येत असलेल्या पुलाच्या कामासाठी शनिवारी रात्री ते रविवारी (ता.१७ नोव्हेंबर) सकाळी ११.३० वाजेपर्यंत १२ तासांचा ब्लॉक घेण्यात आला आहे. यामुळे धीमी आणि हार्बर मार्गिकेवरील सेवा विस्कळीत होणार आहे. तर ब्लॉक कालावधीत राम मंदिर स्थानकात गाड्या थांबणार नसल्याने प्रवाशांची गैरसोय होणार आहे.

जोगेश्वरी आणि गोरेगाव दरम्यानच्या पुलाचे काम करण्यासाठी अप आणि डाऊन धीम्या मार्गांवर तसेच अप आणि डाऊन हार्बर मार्गांवर १२ तासांचा ब्लॉक घेण्यात येणार आहे. १६ नोव्हेंबर रोजी रात्री ११.३० वाजेपासून रविवारी सकाळी ११.३० वाजेपर्यंत ब्लॉक घेण्यात आला आहे. या ब्लॉकमुळे पश्चिम रेल्वेवरील उपनगरीय रेल्वे सेवा आणि काही मेल/एक्स्प्रेस गाड्यांवर परिणाम होणार आहे.

यंदाही पाऊस लवकर; २५ मेपर्यंत केरळात येणे शक्य, नैऋत्य वारे सक्रीय

Mumbai : बहाव्याच्या बहरानेही दिले पावसाचे शुभसंकेत; दादर येथील प्रमोद महाजन कला पार्कात बहावा बहरला

ड्रग्ज माफिया सलीम डोला तुर्कियेमध्ये ताब्यात; दाऊद इब्राहिमला मोठा धक्का; अमली पदार्थांच्या जाळ्याचा पर्दाफाश होणार

खंडाळ्याच्या घाटातून होणार झपाझप प्रवास; मिसिंग लिंकचे उद्घाटन ठरल्यानुसार १ मे रोजी

आता रखडलेल्या भूखंडांचाही होणार विकास; लाखो मुंबईकरांना दिलासा; DCPR मध्ये चिंचोळ्या गल्लीतील भूखंडांचाही समावेश