'एआय'ने बनविलेली प्रातिनिधिक प्रतिमा
मुंबई

हॉटेल व्यावसायिकांना ‘गॅस’ मिळेना; मुख्यमंत्र्यांकडे व्यक्त केली हतबलता

व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या तुटवड्यामुळे मुंबई, ठाणे आणि इतर शहरांतील हॉटेल उद्योग आजही संकटाचा सामना करत आहे. नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी हॉटेल उद्योगासाठी एलपीजी सिलिंडरच्या पुरवठ्यात २०% वाढ करण्याची घोषणा केली, तरी प्रत्यक्ष परिस्थितीमध्ये कोणताही बदल झालेला नाही, असे ‘इंडियन असोसिएशन ऑफ हॉटेल्स अँड रेस्टॉरंट्स’चे (आहार) अध्यक्ष विजय शेट्टी यांनी सांगितले.

Swapnil S

मुंबई : व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या तुटवड्यामुळे मुंबई, ठाणे आणि इतर शहरांतील हॉटेल उद्योग आजही संकटाचा सामना करत आहे. नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी हॉटेल उद्योगासाठी एलपीजी सिलिंडरच्या पुरवठ्यात २०% वाढ करण्याची घोषणा केली, तरी प्रत्यक्ष परिस्थितीमध्ये कोणताही बदल झालेला नाही, असे ‘इंडियन असोसिएशन ऑफ हॉटेल्स अँड रेस्टॉरंट्स’चे (आहार) अध्यक्ष विजय शेट्टी यांनी सांगितले.

शेट्टी म्हणाले, ‘आहार’च्या शिष्टमंडळाने भुजबळ यांची भेट घेऊन त्यांना या वास्तवाची कल्पना दिली असून, त्यांनी आमच्या तक्रारींचे निवारण करण्याचे आश्वासन दिले आहे.

शेट्टी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचीही भेट घेतली, ज्यांनी इलेक्ट्रिक इंडक्शन हॉट प्लेट्स वापरण्याचा सल्ला दिला. ‘मात्र, हॉट प्लेट्सवर मोठ्या प्रमाणावर अन्न शिजवणे अशक्य असल्याचे आम्ही त्यांना सांगितले आणि हॉटेल उद्योग वाचवण्यासाठी तातडीने हस्तक्षेप करण्याची विनंती केली.

सुमारे २० हजार हॉटेलपैकी बहुतेक हॉटेल्स इंधनासाठी एलपीजी सिलिंडरवर अवलंबून आहेत. सिलिंडरअभावी त्यांनी आपल्या पदार्थांच्या संख्येत मोठी कपात केली आहे.

व्यावसायिक एलपीजीचा काळाबाजार

उद्योगातील सूत्रांनी आरोप केला आहे की, मुंबईत व्यावसायिक एलपीजी सिलिंडरचा काळाबाजार जोमाने सुरू आहे. एका सिलिंडरची अधिकृत किंमत १,८३५ रुपये असली तरी तो ३,००० रुपयांना विकला जात असल्याचे समजते.

"व्हिडीओ पाहायला आमच्याकडे वेळ नाही"; CJP आंदोलकांच्या याचिकेवर सरन्यायाधीश सूर्य कांत यांचे भाष्य, तातडीच्या सुनावणीस नकार

आता AI ठेवणार पक्ष्यांवर नजर! महाराष्ट्रात उभारलं जाणार देशातील पहिलं AI-आधारित पक्षी अभयारण्य

Mumbai Rains : पावसात अडकलेल्या मुंबईकरांना 'Vi'चा दिलासा! स्टोअरमध्ये घेता येणार आश्रय, मोबाईल चार्जिंगचीही सोय

१८ वर्षीय तरुणाने घातला ६५ कोटींचा गंडा! AI च्या मदतीने बनवले १२१ बनावट अ‍ॅप्स

Mumbai Rain Alert : मुंबईत मुसळधार पावसासह भरतीचाही धोका; वादळी वाऱ्याचा इशारा, नागरिकांना सतर्कतेचे आवाहन