Ganeshotsav 2026 : मुंबई ते मडगाव दरम्यान आणखी ४ विशेष गाड्या (संग्रहित फोटो)
मुंबई

Ganeshotsav 2026 : मुंबई ते मडगाव दरम्यान आणखी ४ विशेष गाड्या

मध्य रेल्वेने मुंबई आणि मडगाव दरम्यान ४ अतिरिक्त गणपती विशेष गाड्या चालविण्याचा निर्णय घेतला आहे.

Swapnil S

मुंबई: मध्य रेल्वेने मुंबई आणि मडगाव दरम्यान ४ अतिरिक्त गणपती विशेष गाड्या चालविण्याचा निर्णय घेतला आहे. या गाड्यांमुळे एकूण गणपती विशेष गाड्यांची संख्या ३९४ झाली आहे. यात नियमित गाड्यांव्यतिरिक्त मध्य रेल्वेच्या २६२, पश्चिम रेल्वेच्या ६४, कोकण रेल्वेच्या ६२ आणि दक्षिण मध्य रेल्वेच्या ६ विशेष गाड्यांचा समावेश आहे.

पनवेल मडगाव पनवेल विशेष गाड्या ४ सेवा चालविण्यात येणार आहेत. यामध्ये गाडी क्रमांक ०१११३ ही विशेष गाडी २१ आणि २८ सप्टेंबर रोजी पनवेल येथून सकाळी १० वाजता सुटेल आणि त्याच दिवशी रात्री ११.५५ वाजता मडगाव येथे पोहोचेल. या गाडीच्या २ सेवा चालविण्यात येणार आहेत.

तर गाडी क्रमांक ०१११२ ही विशेष गाडी २० आणि २७सप्टेंबर रोजी मडगाव येथून रात्री ८.०० वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ९.०० वाजता पनवेल येथे पोहोचेल. या गाडीच्या २ सेवा चालतील.

या गाडीला पेण, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, सावर्डा, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, विलवडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, नांदगाव रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी रोड, थिवि आणि करमाळी स्थानकात थांबा देण्यात आला आहे तर १ प्रथम वातानुकूलित सह वातानुकूलित द्वितीय, २ वातानुकूलित द्वितीय, ४

वातानुकूलित तृतीय, २ वातानुकूलित तृतीय इकॉनॉमी, ६ शयनयान, ४ सामान्य द्वितीय श्रेणी, १ द्वितीय आसनासह गार्ड्स ब्रेक व्हॅन आणि १ जनरेटर व्हॅन अशी या डब्यांची संरचना असेल. गाडी क्रमांक ०१११३ साठी आरक्षण २० सप्टेंबर रोजी सर्व पीआरएस केंद्रांवर आणि आयआरसीटीसीच्या संकेतस्थळावर (www. irctc.co.in) सुरू होईल. सामान्य दरांसह अनारक्षित डब्यांचे बुकिंग यूटीएस प्रणालीद्वारे करता येईल. प्रवासी तिकीट आरक्षणासाठी 'रेलवन' ॲपचाही वापर करू शकतात.

(संबंधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

UPI तिकीट, पास खरेदीवर प्रवाशांना भुर्दंड; ५.९० रुपये अधिक मोजावे लागणार

समृद्धी ते पुणे ६ तासांच्या पाठलागाचा थरार; १.१३ कोटींचा गुटखा जप्त

Mumbai : आदित्य ठाकरेंना ५०० कोटींची अब्रुनुकसानीची नोटीस; 'मातोश्री' बाहेर हायव्होल्टेज ड्रामा

१९६५ च्या भारत-पाक युद्धाचे हिरो ए. टी. कूक यांचे निधन

Mumbai : मेट्रोच्या कामादरम्यान दुचाकीवर बॅरिकेड कोसळले; विक्रोळीत प्लंबरचा मृत्यू