Mumbai : सीईटी परीक्षेत गुण वाढवून देण्याचे आश्वासन; कथित ध्वनिफितीविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार 'एआय'ने संपादित केलेली प्रातिनिधिक प्रतिमा
मुंबई

Mumbai : सीईटी परीक्षेत गुण वाढवून देण्याचे आश्वासन; कथित ध्वनिफितीविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार

सीईटी परीक्षेसंदर्भात उमेदवारांच्या परीक्षा केंद्राचे व्यवस्थापन करून गुण वाढवून देण्याबाबतच्या कथित संभाषणाच्या ध्वनिफीत समोर आली आहे.

Swapnil S

मुंबई : सीईटी परीक्षेसंदर्भात उमेदवारांच्या परीक्षा केंद्राचे व्यवस्थापन करून गुण वाढवून देण्याबाबतच्या कथित संभाषणाच्या ध्वनिफीत समोर आली आहे. याप्रकरणी सीईटी कक्षाने मुंबई येथील आझाद मैदान पोलीस स्टेशनमध्ये लेखी तक्रार दाखल केली आहे.

सीईटी कक्षाकडे सीईटीच्या परीक्षेबाबत एका कथित ध्वनिफीतची ध्वनिचित्रफितीची तक्रार प्राप्त झाली होती. या व्हिडिओमधील संभाषणामध्ये एका महिलेने दूरध्वनीद्वारे एका पुरुषाशी संभाषण करताना आर्थिक मोबदला स्वीकारून एमएचटी सीईटी परीक्षेसंदर्भात परीक्षा केंद्राचे व्यवस्थापन करणे, उमेदवाराची परीक्षा नियोजित पद्धतीने पार पाडणे तसेच संबंधित उमेदवाराचे गुण वाढवून देण्याबाबत आश्वासन दिले असल्याचे निदर्शनाला येते. या कथित संभाषणामध्ये आर्थिक व्यवहाराचा उल्लेख करण्यात आलेला आहे.

(संबधित इंग्रजी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

जनतेच्या आरोग्य रक्षणासाठी आम्ही कटिबद्ध! अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांची नि:संदिग्ध ग्वाही

Tiger Shroff Firing Case : ‘त्या’ आरोपीचे वय तपासा! मकोका न्यायालयाचे पोलिसांना आदेश

Mumbai : नव्या विकासकावर जुन्या विकासकाची देणी लादणे बेकायदा; उच्च न्यायालयाचा निर्णय, महारेराचा आदेश रद्द

देशभरात ६० हजार कोटींची सुवर्ण उलाढाल; सोने खरेदीच्या उत्साहाने धनत्रयाेदशी साजरी

OBC क्रिमिलेअरसाठी पगार, कृषी उत्पन्न आधार नाही; सुप्रीम कोर्टाचा केंद्राला धक्का