ताज्या म्हावऱ्यावर खवय्ये मारणार ताव...; ‘सी फूड प्लाझा‘पुन्हा एकदा मुंबईकरांच्या सेवेत 
मुंबई

ताज्या म्हावऱ्यावर खवय्ये मारणार ताव...; ‘सी फूड प्लाझा‘पुन्हा एकदा मुंबईकरांच्या सेवेत

पर्यटनाला चालना देण्यासह देश विदेशातील खवय्यांना पुन्हा एकदा ताजा ताजा मासळीचा आस्वाद घेता येणार आहे. माहिम चौपाटी परिसरात पुन्हा एकदा मुंबईकरांच्या सेवेत 'सी फूड प्लाझा' आला आहे. विशेष म्हणजे आठवड्याचा प्रत्येक बुधवार, शुक्रवार, शनिवार आणि रविवार संध्याकाळी ७ ते रात्री ११ वाजेपर्यंत सी फूड प्लाझा सुरू राहणार आहे.

Swapnil S

मुंबई : पर्यटनाला चालना देण्यासह देश विदेशातील खवय्यांना पुन्हा एकदा ताजा ताजा मासळीचा आस्वाद घेता येणार आहे. माहिम चौपाटी परिसरात पुन्हा एकदा मुंबईकरांच्या सेवेत 'सी फूड प्लाझा' आला आहे. विशेष म्हणजे आठवड्याचा प्रत्येक बुधवार, शुक्रवार, शनिवार आणि रविवार संध्याकाळी ७ ते रात्री ११ वाजेपर्यंत सी फूड प्लाझा सुरू राहणार आहे.

मुंबईकरांना दर्जेदार, ताज्या आणि चविष्ट अशा माशांच्या मेजवानीचा आस्वाद उपलब्ध करून देण्यासाठी मुंबईतील पहिला सी फूड प्लाझा माहीम चौपाटी परिसरात पुन्हा एकदा सज्ज झाला आहे. शनिवारपासून माहीम सी फूड प्लाझा येथे महिला बचत गटांचे स्टॉल्स कार्यरत झाले आहेत.

पर्यटनाला चालना देण्यासह देश विदेशातील खवय्यांना पुन्हा एकदा ताजा ताजा मासळीचा आस्वाद घेता येणार आहे.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे गटनेते तथा जी उत्तर प्रभाग समिती अध्यक्ष यशवंत किल्लेदार, मराठी अभिनेते कमलाकर सातपुते, जी उत्तर विभागाचे सहाय्यक आयुक्त योगेश देसाई आदींसह पालिका अधिकारी, महिला उपस्थित होत्या. आकर्षक रंगसंगती, सेल्फी पॉइंट, आरामदायी आसन व्यवस्था आणि कोळी गीतांचा आणि पदार्थांचा आस्वाद घेण्यासाठी सर्वतोपरी व्यवस्था उपलब्ध करून देण्यात आली आहे. महिला बचतगट आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासह पर्यटन वृद्धीसाठी मुंबईतील पहिला ‘सी फूड प्लाझा’ माहीम चौपाटी लगत सुरू करण्यात आला.

माहिम चौपाटी परिसरात पुन्हा एकदा मुंबईकरांच्या सेवेत 'सी फूड प्लाझा' आला आहे.

सेल्फी पाॅइंट आकर्षक रोषणाई

माहिम चौपाटी स्थित सी फूड प्लाझाच्या ठिकाणी आकर्षक अशा रोषणाई करण्यात आली आहे. नागरिकांना आणि पर्यटकांना सेल्फी पॉइंटच्या ठिकाणी छायाचित्रं घेण्याचीही उत्तम व्यवस्था उपलब्ध आहे. या महिला बचत गटांना मत्स्य उत्पादनावर आधारित प्रशिक्षणही देण्यात आले आहे. व्यवसाय कौशल्य विकसित होतानाच महिलांचे जीवनमान उंचावेल, तसेच स्थानिक अर्थव्यवस्था वाढीस लागण्यासोबतच विकासही होईल, याचा प्रयत्न पालिका प्रशासनाने केला आहे.

आठवड्याचा प्रत्येक बुधवार, शुक्रवार, शनिवार आणि रविवार संध्याकाळी ७ ते रात्री ११ वाजेपर्यंत सी फूड प्लाझा सुरू राहणार आहे.

कोळी खाद्यसंस्कृतीला प्रोत्साहन द्या!

मुंबईतील कोळीवाडे आणि येथील खाद्यसंस्कृती ही वैशिष्ट्यपूर्ण आहेत. कोळीवाड्यांचे संवर्धन आणि कोळी खाद्यसंस्कृतीला चालना देण्यासाठी महानगरपालिका प्रशासन प्रयत्नशील आहे. नागरिकांनी या ठिकाणी मोठ्या संख्येने भेट देऊन कोळी संस्कृती आणि कोळी खाद्यसंस्कृतीला प्रोत्साहित करावे, असे आवाहन जी (उत्तर) विभागाचे सहाय्यक आयुक्त योगेश देसाई यांनी केले आहे.

(इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

प्रकल्प पर्यावरणपूरकच; टोरंटबाबत मुख्यमंत्र्यांचे सडेतोड उत्तर; विरोधकांकडून केवळ 'फेक नरेटिव्ह'...

SIR साठी वापरलेल्या सॉफ्टवेअरची माहिती देणे अशक्य; ट्रेड सिक्रेट असल्याचे निवडणूक आयोगाचे स्पष्टीकरण

राष्ट्रवादीला अर्थखाते? फडणवीस यांचा सकारात्मक प्रतिसाद; हिवाळी अधिवेशनापूर्वी निर्णय होण्याची शक्यता

Navi Mumbai : 'नैना'त १५ लाख रोजगार निर्मिती; भूमिपुत्रांना प्राधान्य, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही

स्थानिकांच्या उत्पादनांना प्राधान्य द्या! 'मन की बात'मधून पंतप्रधानांचे नागरिकांना आवाहन