Mumbai : शंख-शिंपल्यांपासून साकारली ९.५ फुटांची इको-फ्रेंडली गणेशमूर्ती; मालाडच्या श्री साई दर्शन मित्रमंडळाचे १७ व्या वर्षात पदार्पण 
मुंबई

Mumbai : शंख-शिंपल्यांपासून साकारली ९.५ फुटांची इको-फ्रेंडली गणेशमूर्ती; मालाडच्या श्री साई दर्शन मित्रमंडळाचे १७ व्या वर्षात पदार्पण

पर्यावरणपूरक संदेश आणि कलात्मक भक्तीचा १७ वर्षांचा वारसा जपत मालाड पश्चिम येथील श्री साई दर्शन मित्रमंडळाने यंदाच्या गणेशोत्सवासाठी ९.५ फूट उंच गणपतीची अनोखी मूर्ती साकारली आहे.

प्रतिनिधी

मनोज रामकृष्णन

मुंबई : पर्यावरणपूरक संदेश आणि कलात्मक भक्तीचा १७ वर्षांचा वारसा जपत मालाड पश्चिम येथील श्री साई दर्शन मित्रमंडळाने यंदाच्या गणेशोत्सवासाठी ९.५ फूट उंच गणपतीची अनोखी मूर्ती साकारली आहे. ही मूर्ती संपूर्णपणे शंख-शिंपले, कागद आणि कार्डबोर्डचा वापर करून बनवण्यात आली आहे.

१०० किलो वजनाची ही मूर्ती तयार करण्यासाठी सुमारे ४५ दिवसांचे कष्टपूर्वक काम लागले आहे. मंडळाच्या परंपरेनुसार, ही मूर्ती कोणत्याही व्यावसायिक मूर्तिकाराकडून करून न घेता मंडळाच्याच निष्ठावंत कार्यकर्त्यांनी स्वतः तयार केली आहे. मालाड सबवेच्या जवळ असलेले हे मंडळ स्थानिक गणेशभक्तांनी सुरू केले होते आणि आता त्यांची पुढची पिढी ही परंपरा अभिमानाने पुढे चालवत आहे.

शंख-शिंपले गुजरातवरून

श्री साई दर्शन मित्रमंडळाचे सदस्य मोंटू रुईया यांनी सांगितले की, मूर्ती सुरुवातीला कार्यशाळेत तयार केली जाते आणि नंतर मंडपात आणली जाते. तिथे आमचे कार्यकर्ते अतिशय वेगाने आणि बारकाईने शंख-शिंपले मूर्तीवर चिकटवण्याचे काम करतात. यासाठी लागणारे शंख-शिंपले गुजरातवरून आणले जातात आणि ते पूर्णपणे नैसर्गिक रंगांचे आहेत.

जलचरांना कोणतीही हानी नाही

यंदाची शंख-शिंपल्यांची मूर्ती ही त्याच संकल्पनेचा भाग आहे. मार्वे खाडीत विसर्जन करताना जलचर परिसंस्थेला कोणतीही हानी न पोहोचवता ही मूर्ती सहज पाण्यात विरघळेल, असेही रुईया यांनी नमूद केले.

पर्यावरणपूरक पर्यायांचा शोध

शाडू आणि प्लास्टर ऑफ पॅरिस (पीओपी) ऐवजी पर्यावरणपूरक पर्यायांचा वापर करत सण साजरा करण्यासाठी मंडळ दरवर्षी नव्या वस्तूंचा शोध घेते. गेल्या वर्षी या मंडळाने बदाम, पिस्ता, काजू, अक्रोड आणि मॅकाडामिया या सुक्या मेव्याच्या टरफलांपासून कागद आणि कार्डबोर्डच्या सहाय्याने गणेशमूर्ती साकारली होती.

(इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

BEST बसचालकांची बेदरकारी वाढली; ८९८ जणांवर कारवाई, पैकी ७८९ कंत्राटी चालक, पादचाऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

Mumbai : कुर्ल्यात अतिक्रमणांपासून मुक्ती; बेकायदा बांधकामे, स्टॉल जमीनदोस्त, एल विभागाची कारवाई

सीईटी परीक्षेचीही SIT चौकशी; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती

संजुक्ता पराशर बनल्या ‘कोब्रा’ दलाच्या IG; कमांडो दलाचे नेतृत्व करणाऱ्या पहिल्या महिला अधिकारी

समान नागरी कायद्याला JDU ची सशर्त तयारी