मुंबईला मलेरिया डेंग्यूचा घट्ट विळखा; तीन महिन्यांत मलेरियाचे साडेचार हजार रुग्ण प्रातिनिधिक छायाचित्र
मुंबई

मुंबईला मलेरिया डेंग्यूचा घट्ट विळखा; तीन महिन्यांत मलेरियाचे साडेचार हजार रुग्ण

पावसाळ्यात उद्भवणाऱ्या साथीच्या आजारांनी मुंबईत थैमान घातले असून जून, जुलै, ऑगस्टमध्ये मलेरियाच्या ४,४८५, डेंग्यूचे १,५६३ तर लेप्टोच्या २५५ रुग्णांची नोंद झाली आहे. दरम्यान, मलेरिया डेंग्यूच्या प्रसारास कारणीभूत एडिस व अनोफिलीस डासांच्या ५५ हजार ४०७ उत्पत्ती स्थाने आढळली आहेत.

Swapnil S

मुंबई : पावसाळ्यात उद्भवणाऱ्या साथीच्या आजारांनी मुंबईत थैमान घातले असून जून, जुलै, ऑगस्टमध्ये मलेरियाच्या ४,४८५, डेंग्यूचे १,५६३ तर लेप्टोच्या २५५ रुग्णांची नोंद झाली आहे. दरम्यान, मलेरिया डेंग्यूच्या प्रसारास कारणीभूत एडिस व अनोफिलीस डासांच्या ५५ हजार ४०७ उत्पत्ती स्थाने आढळली आहेत. मुंबईत २ लाख ३४ हजार ५९१ लोकांचा सर्वे केला असून ७१ हजार ४३५ लोकांचे रक्ताचे नमुने तपासणी प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहे.

त्यामुळे मुंबईत मलेरिया डेंग्यू लेप्टोने थैमान घातले असून मुंबईला साथीच्या आजारांचा घट्ट विळखा पडला आहे.

जुलै महिन्यापासून पावसाची दमदार इनिंग झाली असून ऑगस्ट महिन्यात तीन दिवस पाऊस बरसला तरीही विविध आजारांचा प्रादुर्भाव वाढला आहे. पावसाळ्यात उद्भवणाऱ्या साथीच्या आजारांनी पाय रोवले आहेत. साथीचे आजार रोखण्यासाठी आरोग्य विभागाने कंबर कसली आहे. गेल्या महिन्याच्या (जून २०२६) तुलनेत या महिन्यात (जुलै २०२६) मलेरिया, डेंग्यू, गॅस्ट्रो, लेप्टोस्पायरोसिस आणि स्वाइन फ्लूच्या रुग्णसंख्येत वाढ झाल्याचे आरोग्य विभागाने दिलेल्या आकडेवारीतून समोर आले आहे.

आरोग्य विभागामार्फत सर्व पालिका रुग्णालये आणि आरोग्य केंद्रांच्या परिसरात मलेरिया व डेंग्यूच्या प्रतिबंधासाठी नियमित सर्वेक्षण, पाणी साचणाऱ्या ठिकाणांचा नायनाट करून 'शून्य डास प्रजनन मोहीम' राबवली.

लेप्टोचा धोका; पावसाच्या पाण्यातून चालणे टाळा!

एफ-उत्तर, एम-पूर्व, टी, के-पूर्व आणि जी-उत्तर विभागातील विविध परिसरांत लेप्टोस्पायरोसिसच्या रुग्णसंख्येत वाढ दिसून येत आहे. साचलेल्या पावसाच्या पाण्यातून विना चप्पल चालणे टाळावे आणि शक्य असल्यास गमबूट वापरावेत, असा सल्ला पालिकेने दिला आहे.

२७,३५२ एडिस डासांची उत्पत्ती स्थाने

यंदा डेंग्यूच्या रुग्णसंख्येत गतवर्षाच्या तुलनेत काहीशी घट झाली आहे. डेंग्यूच्या डासांची उत्पत्ती रोखण्याचे मोठे आव्हान कायम आहे. पालिकेने तब्बल १२ लाख ५२ हजार ४६९ उत्पत्तीस्थाने तपासली, त्यापैकी २७ हजार ३५२ एडिस डासांची उत्पत्ती आढळली. ही उत्तत्पी स्थाने नष्ट करण्याची गरज आहे.

२ लाख ३४ हजार लोकांचे सर्वेक्षण; ७५ हजार रक्तनमुने

महापालिकेने जून जुलै व ऑगस्टदरम्यान २ लाख ३४ हजार ५९१ घरांचे सर्वेक्षण केले असून ७१ हजार ४३५ रक्तनमुने संकलित करण्यात आले.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

महाराष्ट्रातील टोलनाक्यांवर ईडीचे छापे; टोल वसुली अन्यत्र वळवल्याचा संशय

मतदारांची नावे वगळणे न्यायालयाने थांबवावे; कपिल सिब्बल यांची मागणी

२०० वर्षांनी घरात जन्माला आली मुलगी; ढोल-ताशांच्या गजरात रथातून मिरवणूक काढत लेकीचे जंगी स्वागत

भावाच्या मृत्यूप्रकरणी अद्याप FIR नाही; सुप्रिया सुळे यांचा सरकारवर हल्लाबोल

एसटी आता 'विना वाहक'; महामंडळाची आर्थिकस्थिती सुधारण्यासाठी मनुष्यबळ खर्चात कपात