'एआय'ने बनविलेली प्रातिनिधिक प्रतिमा
मुंबई

Mumbai : इंग्रजी, उर्दूतील नामफलक हटवा; मराठी पाट्या लावा, अन्यथा...उपमहापौरांचा इशारा; पंचतारांकित हॉटेल, सेलिब्रिटींची दुकाने व आस्थापना रडारवर

मराठी पाट्यांचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आल्यामुळे यावरून राजकारण तापण्याची शक्यता आहे.

Swapnil S

मुंबई : मुंबईतील दुकाने व आस्थापनांवर इंग्रजी आणि उर्दूतील नामफलक हटवा आणि ठळकपणे दिसतील अशा देवनागरी लिपीत फलक लावावेत, अन्यथा शिवसेना स्टाईलने उत्तर देणार, असा इशारा उपमहापौर संजय घाडी यांनी दिला आहे. दरम्यान, पंचतारांकित हॉटेल, सेलिब्रिटींची दुकाने आणि आस्थापना यांनाही मराठी पाट्या लावणे बंधनकारक आहे. मात्र, दुर्लक्ष केले तर कारवाई करण्यात येईल तसेच अधिकाऱ्यांनी कारवाई करण्याकडे दुर्लक्ष केले तर अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल, असा थेट इशारा विधी समिती अध्यक्षा दीक्षा कारकर यांनी दिला. दुकाने व आस्थापना विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक बुधवारी आयोजित करण्यात आली होती. बैठकीनंतर ते बोलत होते. यावेळी विधी समिती अध्यक्षा दीक्षा कारकर उपस्थित होत्या.

मुंबईत ९ लाख दुकाने व आस्थापना असून त्यापैकी आजही ५ हजार २० अस्थापनांनी मराठी पाट्या लावण्याकडे दुर्लक्ष केल्याचे समोर आले आहे. यानंतर ३,११४ आस्थापनावर दंडात्मक कारवाई करत १ कोटी ९१ लाख ४८ हजार ९७५ रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. मात्र, आजही मुंबईत ५,०२० आस्थापनावर मराठी पाट्या लावण्याकडे दुर्लक्ष केले आहे. या आस्थापनांनी महिनाभरात ठळकपणे दिसतील अशा देवनागरी लिपीत मराठी पाट्या लावाव्यात. याबाबत ज्या अस्थापनांना नोटीस बजावण्यात आली नसेल त्या आस्थापनांना नोटीस बजावण्याचे निर्देश पालिका प्रशासनाला दिल्याचे दीक्षा कारकर यांनी सांगितले. मराठी पाट्यांचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आल्यामुळे यावरून राजकारण तापण्याची शक्यता आहे.

मराठी पाट्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार बंधनकारक

पंचतारांकित हॉटेल असो वा कुठलीही आस्थापना मराठी पाट्या लावणे सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार बंधनकारक आहे. सध्या अनेक अधिकारी व कर्मचारी मतदार यादी बनवण्याच्या कामात व्यस्त असले तरी मराठी पाट्या आस्थापनांनी लावल्या की नाही याची झाडाझडती घ्यायची आहे. कारवाईकडे दुर्लक्ष केले तर अशा अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल, असा इशारा संजय घाडी यांनी दिला आहे.

...तर महिन्याभरात कारवाई करू!

मराठी पाट्या नाही, अशा अस्थापनाची नावे जमा करा, त्यांच्यावर काय कारवाई केली याचा १५ दिवसांत अहवाल द्या आणि त्यानंतर महिनाभरानंतर कारवाई करण्यात येईल, असे दीक्षा कारकर यांनी सांगितले.

"व्हिडीओ पाहायला आमच्याकडे वेळ नाही"; CJP आंदोलकांच्या याचिकेवर सरन्यायाधीश सूर्य कांत यांचे भाष्य, तातडीच्या सुनावणीस नकार

आता AI ठेवणार पक्ष्यांवर नजर! महाराष्ट्रात उभारलं जाणार देशातील पहिलं AI-आधारित पक्षी अभयारण्य

Mumbai Rains : पावसात अडकलेल्या मुंबईकरांना 'Vi'चा दिलासा! स्टोअरमध्ये घेता येणार आश्रय, मोबाईल चार्जिंगचीही सोय

१८ वर्षीय तरुणाने घातला ६५ कोटींचा गंडा! AI च्या मदतीने बनवले १२१ बनावट अ‍ॅप्स

Mumbai Rain Alert : मुंबईत मुसळधार पावसासह भरतीचाही धोका; वादळी वाऱ्याचा इशारा, नागरिकांना सतर्कतेचे आवाहन