मुंबई : मुंबईच्या मरीन ड्राईव्ह परिसरात नरिमन पॉइंट येथील समुद्रात एका तरुणीचा मृतदेह सापडला आहे. मनिता गुप्ता असे या तरुणीचे नाव असून तिच्या चेहऱ्यावर जखमेच्या खुणा आढळल्या आहेत. घटनेची माहिती मिळताच कफ परेड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पुढील तपास सुरू केला आहे.
नरिमन पॉइंटजवळ सोमवारी एका २४ वर्षीय तरुणीचा मृतदेह समुद्रात आढळून आल्यानंतर कफ परेड पोलिसांनी काळा टी-शर्ट परिधान केलेल्या या तरुणीचा मृतदेह बाहेर काढला. हा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला असून अहवाल आल्यानंतरच पोलिसांना तपासाची दिशा मिळणार आहे.
मनिता गुप्ता ही तरुणी रविवारपासून बेपत्ता असल्याची तक्रार कफ परेड पोलिसांत करण्यात आली होती. त्यानंतर एका दिवसांनी तिचा मृतदेह आढळल्याने तिची हत्या करण्यात आली की आणखी कारण आहे, याबाबतचा सस्पेन्स वाढला आहे.