Mumbai: चर्चगेटच्या आयकर भवनात भीषण आग; अडकलेल्या कर्मचाऱ्यांसाठी अग्निशमन दलाचे शर्थीचे प्रयत्न, VIDEO  (Photo-X/IANS)
मुंबई

Mumbai: चर्चगेटच्या आयकर भवनात भीषण आग; अडकलेल्या कर्मचाऱ्यांसाठी अग्निशमन दलाचे शर्थीचे प्रयत्न, VIDEO

चर्चगेट येथील आयकर कार्यालयात लागलेल्या भीषण आगीमुळे इमारतीत अडकलेल्या कर्मचाऱ्यांना बाहेर काढण्यासाठी अग्निशमन दलाचे युद्धपातळीवर प्रयत्न सुरु असून परिसरात धुराचे लोट पसरले आहेत.

किशोरी घायवट-उबाळे

मुंबई : चर्चगेट येथील महर्षी कर्वे रोडवरील आयकर भवनाच्या बेसमेंटमध्ये सोमवारी (दि. १७) दुपारी सुमारे २ वाजता भीषण आग लागल्याने खळबळ उडाली. आगीमुळे इमारतीच्या वरच्या मजल्यांवर काही कर्मचारी अडकल्याची माहिती मिळताच मुंबई अग्निशमन दलाने तातडीने बचावमोहीम सुरू केली. खिडक्यांमधून शिड्या लावून कर्मचाऱ्यांना सुरक्षित बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू असून, घटनास्थळी अनेक अग्निशमन बंब आणि विशेष आपत्कालीन वाहने दाखल झाली आहेत. दरम्यान, आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

बेसमेंटमध्ये आगीचा भडका

बीएमसीच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षाला दुपारी २ वाजताच्या सुमारास आयकर भवनाच्या बेसमेंटमध्ये आग लागल्याची माहिती मिळाली. ही इमारत बेसमेंटसह तळमजला आणि सात मजल्यांची आहे. अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, आग सध्या बेसमेंटपुरतीच मर्यादित आहे.

वरच्या मजल्यांवरील कर्मचाऱ्यांना बाहेर काढण्याचे प्रयत्न

माहितीनुसार, बेसमेंटमध्ये आग विझवण्याचे काम सुरू असतानाच दुसरे पथक इमारतीच्या वरच्या मजल्यांवर अडकलेल्या कर्मचाऱ्यांना सुरक्षित बाहेर काढत आहे. खिडक्यांमधून शिड्या लावून कर्मचाऱ्यांना बाहेर काढण्याचे प्रयत्न अग्निशमन दलाकडून करण्यात येत आहेत.

अनेक अग्निशमन बंब घटनास्थळी

आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी मुंबई अग्निशमन दलाचे वरिष्ठ अधिकारी आणि कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले आहेत. अनेक अग्निशमन बंबांसह विशेष आपत्कालीन वाहनेही घटनास्थळी तैनात करण्यात आली आहेत. एक पथक आग विझवण्याचे काम करत असून, दुसरे पथक बचावकार्यावर लक्ष केंद्रित करत आहे.

आगीचे कारण अद्याप अस्पष्ट

दरम्यान, आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. आग नियंत्रणात आणल्यानंतर घटनास्थळाची पाहणी करून आगीचे कारण निश्चित केले जाणार आहे. सध्या बचावकार्य आणि आग विझवण्याला प्राधान्य देण्यात आले आहे.

(इंग्रजीत वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

"आंदोलन होणारच"; जंतर-मंतरवरील आंदोलनाला पोलिसांनी परवानगी नाकारल्यावरही अभिजीत दिपके ठाम, म्हणाले - 'तरुणांची भीती...

Nana Patekar Passes Away : 'नानाने माझा जीव वाचवला'; अशोक सराफ यांनी सांगितला भावूक प्रसंग

क्रिकेटसाठी कल्याणहून रत्नागिरीला पोहोचले, पण सामना संपल्यानंतर मृत्यूने गाठले; डोहात बुडून दोन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

'ऑक्टोबर हिट'चा तडाखा! मुंबई, रायगडमध्ये आज उष्णतेची पहिली लाट; ‘यलो अलर्ट’ जारी, कोकणासह ठाणे-पालघरही तापणार

वाढत्या उष्म्याने ठाणे तापले; पाखरांची तहान वाढली, ३६-३७ अंशांचा पारा, मध्यरात्रीही ३०-३१ अंशांची धग