मुंबई

Mumbai : भायखळ्यातील म्हाडाचा ईमारतीला भीषण आग; 135 रहिवाशांना सुरक्षित स्थळी हलवलं

अग्निशमन दलाच्या अथक प्रयत्नांनंतर सकाळी ७.२० मिनीटांनी आग आटोक्यात आणण्यात यश आलं आहे.

नवशक्ती Web Desk

मुंबईतील बहुमजली इमरातीत आज पहाटे भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. भायखळा पूर्व येथील घोडपदेव विभागातील म्हाडा संकुलातील न्यु हिंद मिल कंपाऊंडच्या ३ सी या २४ मजली इमरातील आग लागली. यानंतर तात्काळ पावले उचलंत १३५ नागरिकांना सुखरुप बाहेर काढण्यात आलं. तसंच अग्निशमन दलाच्या अथक प्रयत्नांनंतर सकाळी ७.२० मिनीटांनी आग आटोक्यात आणण्यात यश आलं आहे.

या इमारतीला पहाटे ३.४० मिनिटांनी तिसऱ्या मजलावर आग लागल्याचं सांगितलं जात आहे. या इमरातील मिल कामगार आणि संक्रमण शिबिरातील रहिवासी राहतात. महापालिकेने दिलेल्या माहितीनुसार, १ ते २४ मजल्यावरील इलेक्ट्रिक मीटर केबिन, वायरिंग केबल आणि इलेक्ट्रिक डक्टमधील साहित्यात ही आग लागली.

बचावरकार्य करताना १३५ जणांपैकी २५ जणांना इमरातीच्या टेरेसवरुन, ३० जणांना पंधराव्या मजल्यावरुन तर ८० जणांना २२ व्या मजल्यावरुन बाहेर काढण्यात आलं. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या पाच गाड्या, तीन टँकर आणि तसंच इतरही गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. सकाळी ३.४० मिनीटांनी लागलेली आग ही सकाळी ७.२० वाजता आटोक्यात आल्याचं वृत्त पीटीआयने दिलं आहे.

Maratha Reservation : सलग तिसऱ्या दिवशी वाहतूक विस्कळीत; CSMT परिसरात आंदोलकांचे बस्तान

Maratha Reservation: आंदोलनाची धग वाढणार; मनोज जरांगे आजपासून पाणी पिणेही बंद करणार; एकतर विजययात्रा, नाहीतर अंत्ययात्रा

Maratha Reservation : दक्षिण मुंबईत आज पुन्हा कोंडीची शक्यता

Maratha Reservation : CSMT परिसरात अस्वच्छता; राज्यभरातून अन्नपदार्थांचा ओघ वाढल्याने नासाडी

Maratha reservation protest : सुप्रिया सुळेंना आंदोलकांचा घेराव; गाडीवर बाटल्या भिरकावल्या