संग्रहित छायाचित्र  
मुंबई

Mumbai : महापौरांच्या दिमतीला हायब्रीड इनोव्हा; उपमहापौराच्या चारचाकी वाहनाला भगवा पट्टा; समिती अध्यक्षासाठी नव्या गाड्या

मुंबईचा महापौर ११ फेब्रुवारी रोजी विराजमान होणार यावर शिक्कामोर्तब झाले आहे. तब्बल साडेतीन वर्षांनंतर मुंबईचा महापौर, उपमहापौरांसह वैधानिक समिती अध्यक्ष आदींच्या कार्यालयाची रंगरंगोटी सुरु आहे. तर महापौर उपमहापौर वैधानिक समितीचे अध्यक्ष यासाठी नव्या कोऱ्या गाड्या खरेदी करण्यात आल्या आहेत.

Swapnil S

मुंबई : मुंबईचा महापौर ११ फेब्रुवारी रोजी विराजमान होणार यावर शिक्कामोर्तब झाले आहे. तब्बल साडेतीन वर्षांनंतर मुंबईचा महापौर, उपमहापौरांसह वैधानिक समिती अध्यक्ष आदींच्या कार्यालयाची रंगरंगोटी सुरु आहे. तर महापौर उपमहापौर वैधानिक समितीचे अध्यक्ष यासाठी नव्या कोऱ्या गाड्या खरेदी करण्यात आल्या आहेत.

मुंबई महापालिकेची निवडणूक १५ जानेवारी रोजी पार पडली आणि १६ जानेवारी रोजी निकाल जाहीर झाला. भाजप व शिंदे सेनेला सत्ता स्थापनेचा बहुमान मिळाला असला तरी महापौराचे नाव अद्याप गुलदस्त्यात आहे.

परंतु महापौर व उपमहापौर पदासाठी ११ फेब्रुवारी निवड होणार असून त्यानंतर स्थायी समिती, शिक्षण,सुधार तसेच बेस्ट समिती अध्यक्षांची निवडणूक होणार आहे.

त्यानंतर विशेष समित्या आणि १८ प्रभाग समित्यांच्या निवडणूक होणार आहे. त्यामुळे मागील पावणे चार वर्षांमध्ये नगरसेवक आणि पर्यायाने महापौर व विविध समित्यांचे अध्यक्ष नसल्याने त्यांच्या वाहनांचा वापर अधिकारी वर्गाने केला होता.

त्यामुळे आता नवनिर्वाचित महापौर तसेच उपमहापौरांसह विविध वैधानिक आणि विशेष समित्यांच्या अध्यक्षांसाठी वाहने खरेदीची प्रक्रिया घनकचरा व्यवस्थापन विभागाच्यावतीने पार पडली आहे.

त्यानुसार नव्या महापौरांसाठी नव्याने इनोव्हा एन ही गाडी खरेदी केली जात आहे. ही गाडी इव्ही तसेच पेट्रोलवर आधारीत आहे. अशाप्रकारच्या इनोव्हा वाहनांचा वापर सध्या महापालिकेत अतिरिक्त आयुक्त हे करत आहेत.. तर वैधानिक आणि विशेष समित्यांच्या अध्यक्षांसाठी १२ स्कॉर्पिओंचीही खरेदी केली जात आहे. अध्यक्षांच्या या स्कॉर्पिओ गाड्यांची ओळख व्हावी म्हणून यावर भगव्या रंगाच्या पट्टयांचे डिझाईन तयार करण्यात आली आहे. त्यामुळे अध्यक्षांची वाहने सहजपणे ओळखली जाणे शक्य होणार आहे.

३० लाखांची इनोव्हा, १८ लाखांची स्काॅर्पियो

महापौरसाठी ३० लाखांची इनोव्हा हायब्रीड तर अन्य वैधानिक समिती अध्यक्षासाठी १८ लाखांची स्काॅर्पियो खरेदी करण्यात आल्या असून वाहतूक विभागाकडे नोंदणी झाल्याचे पालिकेतील वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. विशेष म्हणजे महापौर, उपमहापौर यांसह वैधानिक समिती अध्यक्षांच्या वाहनांना भगवा पट्ट्याचा साज चढवण्यात आला आहे.

LPG सिलिंडर बुकिंग आता आणखी सोपं! व्हॉट्सॲप, मिस्ड कॉलपासून ॲपपर्यंत अनेक सुविधा उपलब्ध

देशात पेट्रोल-डिझेलचा तुटवडा नाही; घाबरून इंधन साठवू नका, केंद्र सरकारचे नागरिकांना आवाहन

मध्यपूर्वेतील संघर्षादरम्यान भारतात अडकलेल्या परदेशी नागरिकांना दिलासा; ३० दिवसांची व्हिसा मुदतवाढ, ओव्हरस्टे दंडही माफ

Mumbai : लोकल प्रवाशांसाठी सूचना; उद्या 'या' रेल्वे मार्गांवर मेगाब्लॉक, वाचा वेळापत्रक

एका दिवसात ४५ हजार गॅस सिलिंडरचे वितरण; ठाणे शिधावाटप विभागाचा दावा; घरगुती पुरवठा सुरळीत, व्यावसायिकवर तात्पुरती मर्यादा