प्रातिनिधिक छायाचित्र
मुंबई

Mumbai : तिन्ही रेल्वे मार्गांवर उद्या मेगाब्लॉक; मुख्य, हार्बर आणि पश्चिम मार्गावर ब्लॉक

मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावर सीएसएमटी ते विद्याविहार दरम्यान धीम्या मार्गावर, हार्बर मार्गावर कुर्ला आणि वाशी स्थानकांदरम्यान तसेच पश्चिम रेल्वेच्या चर्चगेट आणि मुंबई सेंट्रल स्थानकादरम्यान धीम्या मार्गावर ब्लॉक असेल.

Swapnil S

मुंबई : रेल्वे रूळ, सिग्नल यंत्रणा आणि ओव्हरहेड उपकरणांच्या देखभालीसाठी मध्य, हार्बर आणि पश्चिम रेल्वे मार्गावर रविवारी (ता.१) ब्लॉक घेण्यात आला आहे. मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावर सीएसएमटी ते विद्याविहार दरम्यान धीम्या मार्गावर, हार्बर मार्गावर कुर्ला आणि वाशी स्थानकांदरम्यान तसेच पश्चिम रेल्वेच्या चर्चगेट आणि मुंबई सेंट्रल स्थानकादरम्यान धीम्या मार्गावर ब्लॉक असेल.

मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावर सीएसएमटी मुंबई ते विद्याविहार दरम्यान सकाळी १०.५५ ते दुपारी ३.५५ पर्यंत अप आणि डाऊन धीम्या मार्गावर ब्लॉक असेल. सीएसएमटी मुंबईहून सकाळी १०.४८ ते दुपारी ३.४५ पर्यंत सुटणाऱ्या डाऊन धीम्या मार्गावरील सेवा सीएसएमटी मुंबई आणि विद्याविहार स्थानकांदरम्यान डाऊन जलद मार्गावर वळवल्या जातील. या लोकल भायखळा, परळ, दादर, माटुंगा, सायन आणि कुर्ला स्थानकांवर थांबतील. त्यानंतर पुढे विद्याविहार स्थानकावर डाऊन धीम्या मार्गावर वळवल्या जातील.

घाटकोपरहून सकाळी १०.१९ ते दुपारी ३.५२ पर्यंत सुटणाऱ्या अप धीम्या गाड्या विद्याविहार आणि सीएसएमटी स्थानकांदरम्यान अप जलद मार्गावर वळवल्या जातील आणि कुर्ला, सायन, माटुंगा, दादर, परेल आणि भायखळा स्थानकांदरम्यान थांबतील.

हार्बर मार्गावर कुर्ला आणि वाशी स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन हार्बर लाइनवर सकाळी ११.१० ते दुपारी ४.१० पर्यंत ब्लॉक असेल. सीएसएमटीहून सकाळी १०.३४ ते दुपारी ४.३६ पर्यंत वाशी, बेलापूर, पनवेलला जाणाऱ्या डाऊन हार्बर लाईन सेवा आणि पनवेल, बेलापूर, वाशीहून सकाळी १०.१७ ते दुपारी ३.४७ पर्यंत सीएसएमटीकडे जाणाऱ्या अप हार्बर लाइन सेवा रद्द राहतील. तर ब्लॉक काळात सीएसएमटी मुंबई-कुर्ला आणि पनवेल ते वाशी विभागांवर विशेष उपनगरीय गाड्या चालवल्या जातील. ब्लॉक कालावधीत हार्बर मार्गावरील प्रवाशांना ठाणे-वाशी, नेरूळ स्थानकांवरून सकाळी १० ते संध्याकाळी ६ वाजेपर्यंत प्रवास करण्याची परवानगी आहे.

चर्चगेट ते मुंबई सेंट्रल दरम्यान ब्लॉक

पश्चिम रेल्वे मार्गावर रविवारी चर्चगेट आणि मुंबई सेंट्रल दरम्यान अप आणि डाऊन धीम्या मार्गांवर पाच तासांचा ब्लॉक घेण्यात आला आहे. हा ब्लॉक सकाळी १०:३५ ते दुपारी ३.३५ पर्यंत पाच तासांचा असेल. ब्लॉक कालावधीत चर्चगेट आणि मुंबई सेंट्रल दरम्यान सर्व धीम्या मार्गावरील गाड्या जलद मार्गांवर चालवल्या जातील. तसेच काही अप आणि डाऊन उपनगरीय सेवा रद्द करण्यात आल्या आहेत. चर्चगेटकडे जाणाऱ्या काही गाड्या वांद्रे किंवा दादर येथून शॉर्ट टर्मिनेट केल्या जातील.

"व्हिडीओ पाहायला आमच्याकडे वेळ नाही"; CJP आंदोलकांच्या याचिकेवर सरन्यायाधीश सूर्य कांत यांचे भाष्य, तातडीच्या सुनावणीस नकार

आता AI ठेवणार पक्ष्यांवर नजर! महाराष्ट्रात उभारलं जाणार देशातील पहिलं AI-आधारित पक्षी अभयारण्य

Mumbai Rains : पावसात अडकलेल्या मुंबईकरांना 'Vi'चा दिलासा! स्टोअरमध्ये घेता येणार आश्रय, मोबाईल चार्जिंगचीही सोय

१८ वर्षीय तरुणाने घातला ६५ कोटींचा गंडा! AI च्या मदतीने बनवले १२१ बनावट अ‍ॅप्स

Mumbai Rain Alert : मुंबईत मुसळधार पावसासह भरतीचाही धोका; वादळी वाऱ्याचा इशारा, नागरिकांना सतर्कतेचे आवाहन