Mumbai : मेट्रो २-बीतील स्थानकांचे नामकरण करा; उपमुख्यमंत्र्यांकडे पत्राद्वारे मागणी 
मुंबई

Mumbai : मेट्रो २-बीतील स्थानकांचे नामकरण करा; उपमुख्यमंत्र्यांकडे पत्राद्वारे मागणी

मेट्रो २-बी मार्गावरील दोन स्थानकांचे नामकरण करण्याची मागणी माजी खासदार राहुल शेवाळे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे.

Swapnil S

मुंबई : मेट्रो २-बी मार्गावरील दोन स्थानकांचे नामकरण करण्याची मागणी माजी खासदार राहुल शेवाळे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे. या मार्गिकेच्या लोकार्पण सोहळ्याच्या निमित्ताने चेंबूर येथे आयोजित करण्यात आलेल्या विशेष कार्यक्रमात शेवाळे यांनी उपमुख्यमंत्र्यांना निवेदन देऊन ही मागणी केली आहे.

या निवेदनानुसार, देवनार स्थानकाचे नामकरण ‘देवनार-महालक्ष्मी मंदिर’ तर छत्रपती शिवाजी महाराज चौक स्थानकाचे नाव ‘छत्रपती शिवाजी महाराज चौक-घाटला गाव, चेंबूर’ असे करण्यात यावे, अशी मागणी शेवाळे यांनी केली आहे. राहुल शेवाळे यांच्या मागणीबाबत बोर्डमध्ये विषय मांडून आणि मुख्यमंत्र्यांना निवेदन देऊन निर्णय घेऊ, असे सूतोवाच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लोकार्पण सोहळ्यातील भाषणात केले.

मेट्रो २-बी मार्गिकेवरील, देवनार स्थानकाच्या जवळ देवनार गाव आहे. इथल्या भूमिपुत्रांची ग्रामदेवता असलेल्या महालक्ष्मी मातेचे मंदिर या स्थानकापासून हाकेच्या अंतरावर आहे. देवनार गावातील ग्रामस्थांच्या मागणीनुसार या स्थानकाचे नामकरण, ‘देवनार-महालक्ष्मी मंदिर’ असे करावे, अशी मागणी माजी खासदार शेवाळे यांनी केली आहे. तसेच, पांजरपोळ इथल्या छत्रपती शिवाजी स्मारकाजवळील स्थानकाच्या शेजारीच घाटला गाव आहे. या ग्रामस्थांच्या मागणीनुसार, स्थानकाचे नाव ‘छत्रपती शिवाजी महाराज चौक-घाटला गाव, चेंबूर’ असे करावे, अशी मागणी करण्यात आली आहे.

देवनार गाव आणि घाटला गाव या दोन्ही स्थानिक भूमिपुत्रांच्या गावांना मोठी परंपरा आहे. या गावांजवळून जाणाऱ्या मेट्रो २-बीच्या स्थानकांचे नामकरणक करण्याची मागणी ग्रामस्थांनी माझ्याकडे केली होती. भूमिपुत्रांची ही मागणी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यापर्यंत पोहोचविण्यासाठी मी लेखी निवेदन दिले. यावर सकारात्मक निर्णय घेण्यासाठी उपमुख्यमंत्री यांनी अनुकूलता दाखवून भूमिपुत्रांच्या मागणीचा सन्मान केला आहे.
राहुल रमेश शेवाळे, माजी खासदार

Maharashtra Rain Alert : राज्यात पुन्हा पावसाचा जोर! 'या' जिल्ह्यांत मुसळधार पावसाचा इशारा; IMD कडून यलो-ऑरेंज अलर्ट

CJP Chalo Sansad March : जंतरमंतरवरील आंदोलकांवर पोलिसांचा लाठीचार्ज; दिल्लीत कडेकोट बंदोबस्त, Video

आता वेटिंगचं नो टेन्शन! IRCTC च्या AI फीचर्समुळे रेल्वे तिकीट होणार मिनिटांत बुक; जाणून घ्या सीक्रेट ट्रिक

डेंग्यूची भीती आता कमी होणार? भारतात पहिली QDENGA लस; जाणून घ्या महत्त्वाची माहिती

'मी मॅन-हेटर आहे'; 'इंडियाज गॉट लेटेंट'मधील वक्तव्यानंतर शिक्षिकेवर निलंबनाची कारवाई? जाणून घ्या नेमकं प्रकरण