CJP Chalo Sansad March : जंतरमंतरवरील आंदोलकांवर पोलिसांचा लाठीचार्ज; दिल्लीत कडेकोट बंदोबस्त, Video

संसद परिसरात कोणताही मोर्चा परवानगीशिवाय जाऊ दिला जाणार नाही, असा इशाराही पोलिसांनी दिला होता.
CJP Chalo Sansad March : जंतरमंतरवरील आंदोलकांवर पोलिसांचा लाठीचार्ज; दिल्लीत कडेकोट बंदोबस्त, Video
CJP Chalo Sansad March : जंतरमंतरवरील आंदोलकांवर पोलिसांचा लाठीचार्ज; दिल्लीत कडेकोट बंदोबस्त, Video(X व्हिडीओ स्क्रीनशॉट्स)
Published on

नवी दिल्ली : कॉकरोच जनता पक्षाच्या (CJP) 'चलो संसद' मोर्चादरम्यान जंतरमंतरवरून संसदेकडे जाण्याचा प्रयत्न करणाऱ्या आंदोलकांना रोखण्यासाठी दिल्ली पोलिसांनी लाठीचार्ज केला. मोर्चाला परवानगी नसल्याचे स्पष्ट करत पोलिसांनी आंदोलकांना पुढे जाण्यापासून रोखले. या पार्श्वभूमीवर जंतरमंतर, संसद परिसर आणि मध्य दिल्लीतील संवेदनशील भागात कडेकोट सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली असून, संपूर्ण परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.

पावसातही जंतरमंतरवर हजारोंची गर्दी

नीट-यूजी २०२६ परीक्षेतील कथित पेपरफुटी आणि अनियमिततेविरोधात CJP ने दिलेल्या 'चलो संसद'च्या हाकेला प्रतिसाद देत हजारो समर्थक सोमवारी सकाळी जंतरमंतर येथे एकत्र आले. मुसळधार पाऊस आणि कडेकोट सुरक्षा व्यवस्थेनंतरही आंदोलनकर्त्यांनी ठिय्या कायम ठेवला.

जंतरमंतरला चारही बाजूंनी घेराव

मोर्चापूर्वीच दिल्ली पोलिसांनी संसद भवनाकडे जाणारे अनेक रस्ते बंद केले. जंतरमंतर परिसराला चारही बाजूंनी बॅरिकेड्स लावून घेराव घालण्यात आला. संसद परिसरात कोणताही विनापरवानगी मोर्चा जाऊ दिला जाणार नाही, असा इशाराही पोलिसांनी दिला होता.

कलम १६३ लागू; मेट्रो स्थानकेही बंद

सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर भारतीय नागरिक सुरक्षा संहिता (BNSS) कलम १६३ अंतर्गत प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आले. तसेच जनपथ, पटेल चौक, राजीव चौक, सेंट्रल सेक्रेटरिएट आणि सेवा तीर्थ या मेट्रो स्थानकांवरील प्रवेश तात्पुरता बंद ठेवण्यात आला.

मोर्चा रोखताना लाठीचार्ज

आंदोलकांनी संसदेकडे पुढे जाण्याचा प्रयत्न केल्यानंतर दिल्ली पोलिसांनी त्यांना अडवण्यासाठी लाठीचार्ज केला. काही ठिकाणी आंदोलक आणि पोलिसांमध्ये धक्काबुक्कीही झाली. त्यानंतर अतिरिक्त पोलीस फौज आणि रॅपिड ॲक्शन फोर्स (RAF) तैनात करून परिस्थिती नियंत्रणात आणण्यात आली.

सरकारशी चर्चेची तयारी

CJP च्या कार्यकर्त्यांनी सरकारशी चर्चेसाठी आपण तयार असल्याचे सांगितले. संघटनेचे कार्यकर्ते सौरव दास यांनी, "सरकारकडून अद्याप कोणताही स्पष्ट प्रस्ताव आलेला नाही. आम्ही चर्चेसाठी तयार आहोत, आता निर्णय सरकारने घ्यायचा आहे," असे सांगितले.

AAP च्या नेत्यांची आंदोलनस्थळी उपस्थिती

आम आदमी पक्षाचे वरिष्ठ नेते मनीष सिसोदिया, संजय सिंह आणि आतिशी यांनी जंतरमंतर येथे आंदोलनकर्त्यांची भेट घेतली. युवकांच्या प्रश्नांवर सर्व विरोधी पक्षांनी एकत्र येण्याचे आवाहन त्यांनी केले.

CJP Chalo Sansad March : जंतरमंतरवरील आंदोलकांवर पोलिसांचा लाठीचार्ज; दिल्लीत कडेकोट बंदोबस्त, Video
सोनम वांगचुक यांना जंतर-मंतरवरून हटवताच आंदोलनाला नवे वळण; अभिजीत दिपकेंचं बेमुदत उपोषण सुरू

अभिजीत दिपके यांचे उपोषण सुरूच

CJP चे संस्थापक अभिजीत दिपके यांच्या बेमुदत उपोषणाचा तिसरा दिवस असून, संसद मोर्चा नियोजितप्रमाणेच काढला जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. शिक्षण क्षेत्रातील कथित गैरव्यवहारांबाबत उत्तरदायित्व निश्चित करण्याची आणि संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी त्यांनी पुन्हा केली.

वांगचुक यांची प्रकृती चिंताजनक

रुग्णालयात उपचार घेत असलेल्या सोनम वांगचुक यांची प्रकृती डॉक्टरांच्या देखरेखीखाली आहे. शिक्षणातील उत्तरदायित्वाचा मुद्दा संसदेत मांडला जाईल, अशी हमी मिळाल्यास आंदोलनाबाबत पुढील निर्णय घेतला जाईल, असे त्यांच्या पत्नी गीतांजली आंगमो यांनी सांगितले.

(इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

logo
marathi.freepressjournal.in