मुंबई

Mumbai : टाटा मुंबई मॅरेथॉनसाठी मेट्रो ३ ची विशेष सोय; जाणून घ्या वेळापत्रक

मॅरेथॉनच्या दिवशी Aqua Line वर पहाटेपासून अतिरिक्त व लवकर सुरू होणाऱ्या मेट्रो सेवा उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहिती मेट्रो प्रशासनाने दिली आहे.

किशोरी घायवट-उबाळे

२०२६ ची 'टाटा मुंबई मॅरेथॉन' येत्या रविवारी, १८ जानेवारीला होणार असून, या मॅरेथॉनमध्ये सहभागी होणाऱ्या हजारो धावपटूंना वेळेत पोहोचता यावे, यासाठी मुंबई मेट्रो ३ (Aqua Line) कडून विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. मॅरेथॉनच्या दिवशी Aqua Line वर पहाटेपासून अतिरिक्त व लवकर सुरू होणाऱ्या मेट्रो सेवा उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहिती मेट्रो प्रशासनाने दिली आहे.

मुंबई मेट्रो ३ (Aqua Line) चे विशेष वेळापत्रक

टाटा मॅरेथॉन दरम्यान धावपटू प्रवाशांच्या सोयीसाठी पुढीलप्रमाणे अतिरिक्त गाड्या सोडण्यात येतील.

  • सकाळी ३:३० वाजता - आरे जेव्हीएलआर व कफ परेड येथून (दोन्ही टर्मिनल्सवरून पहिली ट्रेन)

  • सकाळी ४:३० वाजता - आरे जेव्हीएलआर येथून दुसरी ट्रेन

  • सकाळी ४:५० वाजता - कफ परेड येथून दुसरी ट्रेन

मेट्रो ३ च्या अधिकृत X वर केलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, "मॅरेथॉनसाठी लवकर निघताय? ॲक्वा लाईनसोबत तुमचा प्रवास करा अधिक जलद व सोयीस्कर. टाटा मुंबई मॅरेथॉनच्या निमित्ताने १८ जानेवारी रोजी अतिरिक्त मेट्रो सेवा प्रवाशांसाठी उपलब्ध असतील. सुरक्षित, सोयीस्कर आणि वेळेत प्रवास करा.

मॅरेथॉन कधी सुरू होणार?

  • मॅरेथॉनची सुरुवात : पहाटे ५.०० वाजता

  • सुरुवातीचे ठिकाण : छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT)

  • अंतर : ४२.१९५ किमी

  • समाप्तीचे ठिकाण : एमजी रोड येथील मुंबई जिमखाना

शेकडो धावपटूंची पहाटे प्रवासाची गैरसोय होऊ नये, तसेच मॅरेथॉनसाठी वेळेत पोहोचता यावे, यासाठी मेट्रोने ही विशेष सोय करण्यात आली आहे.

विमा नाही तर पेट्रोल नाही? सुप्रीम कोर्टाचा मोठा प्रस्ताव; तुमच्या गाडीचा इन्शुरन्स कसा काढायचा, जाणून घ्या

राज्यात ॲनालॉग पनीरवर बंदी; हॉटेल्स, रेस्टॉरंट्सना FDA चे आदेश

Nagpur : इंस्टाग्रामवर मैत्री, 'ते' फोटो व्हायरल करण्याची धमकी अन्... १६ वर्षीय मुलीला ओलीस ठेवून अत्याचार, ठाण्याच्या तरुणाला अटक

Navi Mumbai : मुसळधार पावसातही खारघर पाण्यासाठी तहानलेले; पाणी टंचाईवरून नागरिक आक्रमक; सिडको कार्यालयावर धडक मोर्चा

वयाच्या ८०व्या वर्षी पहिल्यांदाच पाहिला समुद्र; लाटांनी पायाला स्पर्श करताच आजोबांनी जे केलं, ते थेट मनाला भिडेल; पाहा VIDEO