मुंबई

Mumbai Metro 3 : प्रवाशांसाठी नव्या MetroConnect3 ॲपचे अनावरण; मोफत वायफायसह 'या' सुविधाही मिळणार एकाच ठिकाणी

मुंबईकरांचा प्रवास अधिक सुलभ आणि डिजिटल करण्याच्या दिशेने MMRC ने आणखी एक पाऊल टाकले आहे. शुक्रवारी MetroConnect3 या नवीन मोबाईल ॲपचे अनावरण करण्यात आले.

नेहा जाधव - तांबे

मुंबईकरांचा प्रवास अधिक सुलभ आणि डिजिटल करण्याच्या दिशेने MMRC ने आणखी एक पाऊल टाकले आहे. शुक्रवारी MetroConnect3 या नवीन मोबाईल ॲपचे अनावरण करण्यात आले. या ॲपच्या माध्यमातून प्रवाशांना तिकीट खरेदी, डिजिटल पेमेंट आणि स्थानकांवरील मोफत वायफाय या सर्व सुविधा एकाच ठिकाणी उपलब्ध होणार आहेत.

३३.५ किलोमीटर लांबीच्या अ‍ॅक्वा लाईनवर (आरे-जेव्हीएलआर ते कफ परेड) दररोज प्रवास करणाऱ्या प्रवाशांना आता लांबच लांब रांगा टाळता येणार आहेत. या ॲपच्या मदतीने तिकीट खरेदी तसेच प्रवासादरम्यान सतत इंटरनेटचा वापरही करणे सोपे झाले आहे.

स्मार्ट प्रवास

मुंबई मेट्रो ३ ने सामाजिक माध्यमांद्वारे या ॲपचे अनावरण करताना "तिकीटांच्या रांगांना म्हणा बाय-बाय!" असं आवाहन केलं आहे. प्रशासनाने सांगितले की, MetroConnect3 ॲप हे स्मार्ट, कॅशलेस आणि पर्यावरणपूरक प्रवासाच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल आहे. या ॲपमुळे प्रवाशांचा वेळ आणि श्रम दोन्ही वाचतील, असे म्हटले आहे.

वायफाय जोडणीची सोपी प्रक्रिया

या ॲपद्वारे प्रवासी मेट्रो स्थानकांच्या कन्कोर्स स्तरावर उपलब्ध MetroConnect3 या सार्वजनिक नेटवर्कशी जोडले जाऊ शकतात. त्यासाठी प्रवाशांनी ॲपमध्ये लॉगिन करून ‘Connect to Wi-Fi’ पर्याय निवडायचा आहे. जोडणी झाल्यावर व्हॉट्सअ‍ॅप कॉलिंग, मेसेजिंग आणि वेब ब्राउझिंग यांसारख्या सर्व सुविधा अखंडपणे वापरता येतात.

अनेक डिजिटल तिकीटिंग पर्याय

MetroConnect3 व्यतिरिक्त प्रवासी Mumbai One App किंवा WhatsApp chatbot च्या माध्यमातूनही मेट्रो तिकीट खरेदी करू शकतात. या सर्व डिजिटल पर्यायांमुळे प्रवास अधिक वेगवान आणि गर्दीमुक्त होईल, असे प्रशासनाने म्हटले आहे.

AQI १०५ वर पोहोचला! मुंबईत हवेची गुणवत्ता घसरली; हिवाळ्यात प्रदूषणाचा उच्चांक गाठण्याची शक्यता

उमेश कोल्हे हत्याकांड : विशेष NIA न्यायालयाने शकील शेखचा फेटाळला जामीन

Mumbai Metro 3 : पहिल्याच दिवशी चर्चगेट स्थानकावर प्रवाशांची मोठी गैरसोय, व्हिडिओ व्हायरल

२०२२ पूर्वी भ्रूण गोठवले असल्यास सरोगसी कायद्यातून सूट; सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल

ई-बस प्रवाशांसाठी खुशखबर; एसटीकडून मासिक व त्रैमासिक पास योजना