मुंबई

Mumbai : प्रवाशांना दिलासा! विधानभवन मेट्रो स्थानकाचे B-४ गेट सुरू; B-५ वर निर्बंध कायम, जाणून घ्या पर्यायी मार्ग

महाराष्ट्र विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर २३ फेब्रुवारी ते २५ फेब्रुवारीदरम्यान B-४ आणि B-५ हे दोन्ही गेट तात्पुरते बंद करण्यात आले होते.

किशोरी घायवट-उबाळे

मुंबई मेट्रो ३ (Aqua Line) कुलाबा-बांद्रा-सीप्झ मार्गावरील विधानभवन मेट्रो स्थानकाचे B-४ प्रवेशद्वार प्रवाशांसाठी पुन्हा खुले करण्यात आले आहे. मात्र, मुंबई पोलिसांच्या निर्देशानुसार B-५ गेट पुढील आदेशापर्यंत बंदच राहणार आहे. ही माहिती मेट्रो ३ प्रशासनाने बुधवारी (२५ फेब्रुवारी) सोशल मीडियाद्वारे दिली.

अर्थसंकल्पीय अधिवेशनामुळे गेट बंद

महाराष्ट्र विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर २३ फेब्रुवारी ते २५ फेब्रुवारीदरम्यान B-४ आणि B-५ हे दोन्ही गेट तात्पुरते बंद करण्यात आले होते. या दोन्ही गेटमधून विधानभवन संकुलात थेट प्रवेश मिळतो.

अधिवेशनादरम्यान वरिष्ठ राजकीय नेते आणि मंत्र्यांची उपस्थिती लक्षात घेता सुरक्षा यंत्रणांनी खबरदारीचा उपाय म्हणून निर्बंध लागू केले होते.

B-५ गेट अद्याप बंद

सध्या B-४ गेट सुरू करण्यात आले असले तरी B-५ गेट पुढील आदेशापर्यंत बंदच राहणार आहे. अधिवेशन काळात स्थानक परिसरात प्रवेश व हालचालींवर काही निर्बंध लागू असू शकतात. त्यामुळे किरकोळ विलंब होण्याची शक्यता असून प्रवाशांनी प्रवासाचे नियोजन त्यानुसार करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

पर्यायी मार्ग

प्रवाशांनी A-१, A-२, A-३, B-१, B-२ आणि B-३ या पर्यायी गेटचा वापर करावा, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

महाराष्ट्र अर्थसंकल्प २०२६

महाराष्ट्राचे अर्थसंकल्पीय अधिवेशन २३ फेब्रुवारीपासून सुरू झाले आहे. राज्याचा २०२६ चा अर्थसंकल्प ६ मार्च रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सादर करणार आहेत. विशेष म्हणजे, या अधिवेशनात विधानसभेत आणि विधान परिषदेत विरोधी पक्षनेतेपद रिक्त असल्याची दुर्मिळ परिस्थिती आहे.

मूळ मालकाला भरपाई दिल्याशिवाय प्रकल्पाग्रस्तांना जमिनीचे वाटप अयोग्य; मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय

प्रल्हाद जोशी नवे केंद्रीय शिक्षणमंत्री; धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर स्वीकारला पदभार

Mumbai : शिवाजी पार्कवर तरुणाईचा महासागर! ठाकरे बंधूंच्या विजय जल्लोष सभेला हजारोंची उपस्थिती; VIDEO

'ही केवळ सुरुवात, अजून खूप लांबचा पल्ला गाठायचा आहे'; अभिजीत दिपकेंचा नवा व्हिडीओ चर्चेत

युनेस्कोकडून सारनाथला जागतिक वारसा स्थळाचा दर्जा; भारताच्या सांस्कृतिक वैभवात मानाचा तुरा, जाणून घ्या इतिहास अन् वैशिष्ट्ये