मुंबई

Mumbai : मेट्रोचा स्पीड वाढणार; वेगमर्यादा विस्तारास मंजुरी; मुंबईकरांच्या वेळेत होणार बचत

मेट्रो लाइन २ए दहिसर ते डीएन नगर हे १८.६ किमीचे अंतर असून या मेट्रो मार्गावर १७ स्थानके आहेत. मेट्रो लाइन ७ अंधेरी (पूर्व) ते दहिसर (पूर्व) हे १६.५ किमीचे अंतर असून या मार्गावर १३ स्थानके आहेत.

Swapnil S

मुंबई : मुंबई मेट्रो लाइन ७ (रेड लाइन) आणि मेट्रो लाइन २ए (यलो लाइन) मार्गावरील नियमित संचालनासाठी रेल्वे सुरक्षा मुख्य आयुक्तांनी सुरक्षा प्रमाणपत्र दिले आहे. यामुळे दोन्ही मेट्रो ५० ते ६० किमी / तास वेगाऐवजी ८० किमी / तास वेगाने चालविण्यास परवानगी मिळाली आहे.

मेट्रो लाइन २ए दहिसर ते डीएन नगर हे १८.६ किमीचे अंतर असून या मेट्रो मार्गावर १७ स्थानके आहेत. मेट्रो लाइन ७ अंधेरी (पूर्व) ते दहिसर (पूर्व) हे १६.५ किमीचे अंतर असून या मार्गावर १३ स्थानके आहेत. हे दोन्ही मार्ग एमएमआरडीएद्वारे चालविण्यात येतात. या दोन्ही मार्गावरून रोज २.५० लाखांहून अधिक प्रवासी प्रवास करतात.

या मार्गासाठी एमएमआरडीएने चालकविरहित ट्रेन सेट्स, सीबीटीसी सिग्नलिंग, प्लॅटफॉर्म स्क्रीन दरवाजे आणि नाविन्यपूर्ण तिकीट प्रणाली अशा अत्याधुनिक तंत्रज्ञानाची अंमलबजावणी करून मुंबईला सुरक्षित, पर्यावरणपूरक आणि कार्यक्षम मेट्रो नेटवर्क उपलब्ध करून दिले आहे.

मेट्रो लाइन ७ आणि २एसाठी मिळालेली नियमित मंजुरी हे मुंबईला कार्यक्षम वाहतूक व्यवस्थेसह जागतिक दर्जाचे शहर बनवण्याच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल आहे. ही उपलब्धी मुंबईकरांना शाश्वत, वेळ वाचवणारी आणि पर्यावरणपूरक वाहतूक पर्याय उपलब्ध करून देण्याच्या आमच्या सरकारच्या वचनबद्धतेचे प्रतीक आहे. मुंबईची सार्वजनिक वाहतूक व्यवस्था शहराच्या विकासाचा आधारस्तंभ करण्याचे आमचे वचन या विकासाच्या माध्यमातून पूर्ण करत आहोत, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.

"मेट्रोचा महत्त्वाचा टप्पा म्हणजे एमएमआरडीएच्या सर्वोच्च सुरक्षा मानकांचे पालन आणि उत्कृष्ट कार्यक्षमता यासाठीच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांचे प्रतीक आहे. वेग मर्यादा वाढविणे आणि सीसीआरएसकडून मिळालेले सुरक्षा प्रमाणपत्र यामुळे मेट्रो प्रवासाचा अनुभव वृद्धिंगत होईल आणि 'मुंबई इन मिनिट्स हे उद्दिष्ट साध्य करण्यात सहाय्य होईल." - डॉ. संजय मुखर्जी, आयुक्त, एमएमएडीए

GST आता फक्त ५ आणि १८ टक्के; नवीन दराचा ‘घट’ २२ सप्टेंबरपासून

शिखर धवनला ED कडून समन्स; दोषी आढळल्यास माजी क्रिकेटपटूवर काय कारवाई होणार?

मराठा आरक्षणाच्या जीआरवरून OBC नेत्यांमध्ये मतमतांतरे; जीआर प्रत फाडत लक्ष्मण हाके यांचे आंदोलन; भुजबळांचा कोर्टात जाण्याचा इशारा

मुंबईची वाढती तहान भागवायला आणखी दोन धरणांचा प्रस्ताव

सुप्रीम कोर्टाची राज्य सरकारला नोटीस; कॉ. पानसरे यांच्या कुटुंबीयांच्या याचिकेवर निर्देश