Mumbai Modak Mahotsav 2026 : बाप्पाचा आवडता खाऊ मुंबईकरांना घरपोच; उकडीच्या व तळलेल्या मोदकांचा घेता येणार आस्वाद संग्रहित छायाचित्र
मुंबई

Mumbai Modak Mahotsav 2026 : बाप्पाचा आवडता खाऊ मुंबईकरांना घरपोच; उकडीच्या व तळलेल्या मोदकांचा घेता येणार आस्वाद

गणेशोत्सवात गणपतीला प्रिय असलेल्या खाऊचा आस्वाद आता भक्तांना घरबसल्या घेता येणार आहे.

गिरीश चित्रे

मुंबई : गणेशोत्सवात गणपतीला प्रिय असलेल्या खाऊचा आस्वाद आता भक्तांना घरबसल्या घेता येणार आहे. मुंबई पालिकेच्या महिला बचत गटांनी तयार केलेले मोदक घरपोच मिळणार आहेत. त्यासाठी 'मोदक महोत्सव २०२६' चे आयोजन करण्यात आले आहे. ही सेवा केवळ मुंबईमध्ये उपलब्ध राहणार आहे. हा मोदक महोत्सव संपूर्ण गणेशोत्सव कालावधीत सुरू राहणार आहे. मुंबईकरांनी केवळ एक दिवस आधी ऑनलाइन नोंदणी करणे आवश्यक असल्याची माहिती बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या नियोजन विभागाने दिली आहे. महिला व बालकल्याण समिती अध्यक्षा मीनल तुर्डे यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात येत आहे.

ऑनलाइन नोंदणी

महानगरपालिकेच्या क्षेत्रातील नागरिक https://shgeshop.com या संकेतस्थळावर बृहन्मुंबई ऑनलाइन नोंदणी करू शकतात. ऑनलाइन नोंदणी केलेल्या नागरिकांना १४ सप्टेंबर २०२६ पासून मोदकांचे घरपोच वितरण केले जाणार आहे.

गणेशोत्सवात मोदकांना मोठ्या प्रमाणात मागणी असते. त्यामुळे वाढत्या मागणीचा विचार करून बृहन्मुंबई महानगरपालिकेने अर्थसहाय्य केलेल्या महिला बचत गटांकडून हा महोत्सव आयोजित करण्यात आला आहे.

उत्पादनांना बाजारपेठ उपलब्ध करण्याचा प्रयत्न!

मुंबई महानगरातील महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम तसेच स्वावलंबी करण्याच्या उद्देशाने महानगरपालिकेच्या माध्यमातून महिला बचत गटांना प्रोत्साहन देण्यात येत आहे. या महिला बचत गटांच्या उत्पादनांना बाजारपेठ उपलब्ध व्हावी, त्यांच्या उद्योगाला चालना मिळावी आणि त्यांना व्यवसायाच्या अधिक संधी उपलब्ध व्हाव्यात, यासाठी विविध नाविन्यपूर्ण व व्यवसायाभिमुख उपक्रम राबविण्यात येतात.

यंदाच्या श्रीगणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर 'मोदक महोत्सव २०२६' चे आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून महिला बचत गटांनी तयार केलेले दर्जेदार मोदक नागरिकांना उपलब्ध होणार असून, गणेशोत्सवाच्या आनंदासोबतच महिला उद्योजकांना प्रोत्साहन देण्याची संधी मुंबईकरांना मिळणार असल्याची माहिती संचालक (नियोजन) डॉ. प्राची जांभेकर यांनी दिली.

असे आहेत मोदकांचे दर

  • उकडीचे ११ नग ५५१ रुपये

  • तळलेले ११ नग- ४५१ रुपये

  • एकूण महिला बचत गट - १५५

(इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

Maratha Reservation : मराठ्यांचे वादळ धडकणार; 'मुंबईत जाणारच' जरांगेंची घोषणा, १९ सप्टेंबरपासून आझाद मैदानात उपोषण

BRICS Summit 2026 : पहलगाम हल्ल्याचा 'ब्रिक्स'कडून निषेध; 'नवी दिल्ली घोषणापत्र' स्वीकारले

गणेशभक्तांच्या वाटेत वाहतूककोंडीचे विघ्न; माणगावजवळ आठ किमीच्या रांगा, मुंबई ते मालवण २२ तास

Mumbai : २१ स्टॉल केले जमीनदोस्त; मानखुर्द, गोवंडीत अतिक्रमणविरोधी मोहीम, पालिकेच्या एम-पूर्व विभागाची कारवाई

आजचे राशिभविष्य, १३ सप्टेंबर २०२६ : जाणून घ्या तुमच्या दिवसाचे ग्रहसंकेत