Mumbai : मोनोरेल यंदाही यार्डातच; सुरक्षेबाबत MMRDA सावध संग्रहित छायाचित्र
मुंबई

Mumbai : मोनोरेल यंदाही यार्डातच; सुरक्षेबाबत MMRDA सावध

मुंबई मोनोरेलची सेवा यावर्षीअखेर पुन्हा सुरू होण्याची शक्यता धूसर आहे. प्रवासी वाहतूक पुन्हा सुरू करण्यापूर्वी एमएमआरडीएने सावध भूमिका घेतली आहे.

प्रतिनिधी

स्वीटी भागवत

मुंबई : मुंबई मोनोरेलची सेवा यावर्षीअखेर पुन्हा सुरू होण्याची शक्यता धूसर आहे. प्रवासी वाहतूक पुन्हा सुरू करण्यापूर्वी एमएमआरडीएने सावध भूमिका घेतली आहे. विशेषतः उन्नत मार्गिकांच्या दोन मार्गांमधील अंतरासंदर्भात आयआयटी मुंबईने सुचवलेल्या सुरक्षा उपायांची अंमलबजावणी होणे बाकी आहे.

प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी तसेच एखादी ट्रेन स्थानकांदरम्यान अडकली तर आपत्कालीन बचावकार्य सुलभ होण्यासाठी या दोन मार्गिकांमधील अंतर भरून काढणे आवश्यक आहे. मात्र, हे अंतर झाकण्यासाठी संरक्षक जाळी किंवा अन्य संरचना बसविण्याचा विचार करताना त्याचा विद्यमान मार्गिकांच्या संरचनेवर होणारा परिणाम एमएमआरडीए तपासत आहे. मोनोरेलच्या तुलनेने हलक्या वजनाच्या यंत्रणेसाठी मूळ मार्गिका तयार करण्यात आल्या आहेत. त्यामुळे अतिरिक्त धातूची जाळी किंवा अन्य संरचना बसवल्यास मार्गिकांवर अतिरिक्त भार पडण्याची आणि संरचनात्मक सुरक्षिततेशी संबंधित अडचणी निर्माण होण्याची भीती अधिकाऱ्यांना आहे.

नवीन खरेदी केलेल्या मोनोरेल गाड्या सेवा सुरू होण्याच्या प्रतीक्षेत उभ्या राहिल्याने त्यांचे आयुष्य कमी होणार का, असा प्रश्न एका वरिष्ठ एमएमआरडीए अधिकाऱ्याला विचारण्यात आला. त्यावर या गाड्यांची नियमित देखभाल केली जात असल्याचे त्यांनी सांगितले. मोनोरेल सेवा सुरू करण्यापूर्वी आवश्यक त्या सर्व खबरदारीच्या उपाययोजना सुनिश्चित करण्यावर एमएमआरडीएचा भर असल्याचे अधिकाऱ्याने स्पष्ट केले.

पारंपरिक मेट्रो आणि उपनगरी रेल्वे व्यवस्थांपेक्षा मोनोरेलची वीजपुरवठा यंत्रणा वेगळी आहे. मोनोरेलला मार्गिकांमधूनच वीजपुरवठा केला जातो. त्यामुळे आपत्कालीन परिस्थितीत शेजारच्या मार्गिकेवर पर्यायी ट्रेन उभी करून बचावकार्य करणे प्रत्येक वेळी पुरेसे ठरेलच असे नाही, असे एमएमआरडीएचे म्हणणे आहे.

(इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

सोने-चांदीची घसरण सुरूच; सोन्याचे दर दोन हजारांनी, तर चांदी ५ हजार रुपयांनी घसरली

PF काढा हप्त्यांवर! खात्यातून ९० टक्के रक्कम काढण्याची मुभा; सुमारे सहा लाख ३२ हजार कर्मचाऱ्यांना लाभ

गोकुळचे दूध महागले! म्हशीच्या दुधात लिटरमागे ६, तर गाईच्या दुधात ४ रुपयांची वाढ; नवनियुक्त संचालक मंडळाच्या पहिल्याच बैठकीत मोठा निर्णय

Mumbai : दाऊदच्या मालमत्तेचे तोडकाम थांबवले; उच्च न्यायालयाने २५ नोव्हेंबरपर्यंत स्थिती ‘जैसे थे’ ठेवण्याचे दिले आदेश

Mumbai : दादर मेट्रो स्थानकाला ‘चैत्यभूमी’ नाव देणार